|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाबुश मोन्सेरातनी गुन्हे वर्तमानपत्रात जाहीर करावेत

बाबुश मोन्सेरातनी गुन्हे वर्तमानपत्रात जाहीर करावेत 

प्रतिनिधी /पणजी :

 काँगेसचे पणजीचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्यावर अनेक गुन्हे असून त्यांची वादग्रस्त अशी कारकीर्द आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवाराने आपले गुन्हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिध्द करायला हवे. पण बाबुश मोन्सेरात यांनी आपले गुन्हे अजून वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेले नाहीत. त्यांनी 17 तारखेच्या अगोदर हे गुन्हे प्रसिद्ध करावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माजी आमदार दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

 बाबुश मोन्सेरात यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्व गोमंतकीयांना माहीत आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात फक्त दोनच गुन्हे जाहीर केले आहेत. पण सर्वोच्च नायालयाचे त्यांनी अजून पालन केले नाही. ते कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार असल्याने कॉंगेस पक्षाने sत्यांचे गुन्हे वर्तमानपत्रातून जाहीर करावे जेणेकरुन जनतेला त्यांचा स्वभाव कळणार आहे. पण अजून त्यांनी आपले गुन्हे प्रसिद्ध केलेले नाहीत, असे नाईक यांनी सांगितले.

 बाबुश यांच्यावर अनेक गुन्हे

 बाबुश मोन्सेरात यांनी पणजी पोलिसस्थानकावर आपल्या कार्यकर्त्यासोबत हल्ला केला होता. त्याचप्रमाणे 2016 साली अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा संशय बाबुश मोन्सेरात यांच्यावर आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मारहाणीचे गुन्हे, विमानतळावर पैसे घेऊन जाताना त्यांना पकडले होते. असे अनेक गुन्हे बाबुश मोन्सेरात यांच्यावर आहेत. त्यांची सुनावणी अजून सुरु आहे. हे सर्व गुन्हे त्यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावे, असे दामू नाईक यांनी सांगितले.

Related posts: