|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोन्सेरात विरोधात केलेल्या पत्रावर मी सही केली नाही

मोन्सेरात विरोधात केलेल्या पत्रावर मी सही केली नाही 

प्रतिनिधी /पणजी :

पणजी पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेरात हे ज्यावेळी जीपीपीडीएचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी बेकायदेशीर काम केल्याची तक्रार आपण केल्याचे ते पत्र खोटे आहे. निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांना देण्यात आलेल्या पत्रावर आपण सही केलेली नाही. त्यावर दिलेला पत्ताही चुकीचा आहे. आपण स्मार्ट सिटीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे हे असे पत्र आपल्या नावाने दिले असावे असा अंदाज व्यक्त करुन या घटनेचा साईश म्हांबरे यांनी निषेध केला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यम संयोजक ट्रॉजन डिमेलो, अमरनाथ पणजीकर, विठू मोरजकर, उफ्ढा&न मुल्ला आणि जना भंडारी यांची उपस्थिती होती. साईश म्हांबरे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही पर्वरी पोलिसस्थानकात तक्रार दाखल करणार आहोत. निवडणुक आयोग आणि मुख्य सचिव यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही पॅमेरा असेलच त्यामुळे हे पत्र कुणी दिले हे शोधून काढण्यास पोलिसांना फ्ढारसा वेळ लागणार नाही.

ट्रॉजन डिमेलो यांनी सांगितले की, अशाप्रकारचे हे कृत्य करणे भाजपसाठी नवीन नाही. यापुर्वी फ्ढिलीप नेरी यांच्याबाबतीतही भाजपने असेच केले होते. मंत्री विजय सरकार आता सांगत आहे की गोव्यातील युवकांच्या हातात हत्यारे द्या. हे गोमंतकीय युवकांना कुठे नेण्याच्या विचारात आहे हे कळत नाही. हल्लीच मंत्री सरदेसाई यांनी एका अधिकाऱयाच्या हातातील मोबाईल खाली पाडला होता. युवकांचा हातात हत्यारे देऊन ते काय सिद्ध करु पाहतात? मंत्री विजय सरदेसाई यांचे ‘गोयकारपण’ जनतेला समजले आहे व भाजपलाही. म्हणूनच भाजपने त्यांना प्रचारात कुठेच सहभागी केलेले नाही.