|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देवी लईराई आज पूर्ण करणार अग्निदिव्याचा पण

देवी लईराई आज पूर्ण करणार अग्निदिव्याचा पण 

  रविराज च्यारी/ डिचोली :

  वंडय़ार मये येथील सात देवी बहिणी व एक भाऊ खेतोबा यांच्यात झालेल्या भांडणानंतर मयेतील देवी केळबाईने अग्नी डोक्मयावर घेऊन चौखांबावर नाचण्याचा केलेला पण अन् तत्पूर्वी देवी लईराईने आपल्या सर्व सातही बहिणींच्या समक्ष अग्निदिव्य मार्गक्रमण करण्याचा केलेला पण म्हणजेच आजचा शिरगाव येथील देवी लईराईचा होमकुंड जत्रोत्सव. आपला अग्निदिव्य मार्गक्रमणाचा पण देवी लईराई आज गुरुवारी पूर्ण करणार आहे. त्यासाठी संपूर्ण शिरगाव सजले आहे. हा सोहळा आपल्या नेत्रांनी टिपून घेण्यासाठी असंख्य लोकांसमवेत देवीच्या इतर सहा बहिणी व एक भाऊही अद्रूष्यावस्थेत उपस्थित राहतात, अशीही आख्यायिका सांगितली जाते.

   लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिरगाव गावातील देवी लईराईच्या प्रसिद्ध जत्रोत्सवासाठी व होमकुंड दिव्यासाठी शिरगावसह आजुबाजूच्या परिसरात भक्तीमय वातावरण पसरले आहे. काल बुधवारी संध्याकाळी होमकुंड रचण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले होते. गावातील रस्ते दुतर्फा फेरीवाल्यांनी सजून गेले आहेत. सर्वत्र रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सारा परिसर झगमगून गेला आहे. तसेच देवीच्या मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई डोळे दिपवत आहे. देवीच्या प्रमुख कार्यातील शिरगाव ग्रामस्थ चौगुले धोंडगण व हजारोंच्या संख्येने राज्यातील व राज्याबाहेर व्रत पाळणाऱया धोंडगणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एकूणच जत्रोत्सवासाठी सर्व पातळीवरून सर्वजण सज्ज झालेले आहेत.

 होमकुंड रचण्याचे काम अंतिम टप्प्यात

 गावातील होमखंडी कुटुंबियांतर्फे वर्ष पध्दतीप्रमाणे रचण्यात येणारे व या जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेले देवीचे भव्य होमकुंड रचण्याचे काम काल बुधवारी सायंकाळी अंतिम टप्प्यात पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत होमखंडी कुटुंबातील सदस्य होमकुंड रचण्याच्या कामात गुंतल्याचे दिसत होते. उशिरापर्यंत होमकुंड स्थळी नवसाची फेड म्हणून मोठय़ा प्रमाणात होमकुंडासाठी लाकडांचे भारे अर्पण केले जात होते. डोक्मयावर सदर लाकडाचा भारा घेऊन होमकुंडाला प्रदक्षिणा मारल्यानंतर होमखंडीकडून गाऱहाणे घालून सदर सेवा रूजू करून घेतली जाते. परंपरेनुसार होमकुंड रचणारे होमखंडीच होमकुंड पुर्णपणे प्रज्वलित झाल्यानंतर निखारे बाजूला करतात व नंतरच अग्निदिव्य मार्गक्रमणास प्रारंभ होतो.

 ग्रामस्थ, चौगुले व इतर धोंडगणही सज्ज

  देवीच्या प्रमुख कार्यात सहभागी होणाऱया देवी लईराईच्या शिरगाव ग्रामस्थ चौगुले धोंडगणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात असून हे धोंडगण आजच्या जत्रोत्सवासाठी सज्ज झालेले आहेत. मोठय़ा प्रमाणात जत्रेत सहभागी होणारे देवीचे भाविक धोंडगणांचे काल बुधवारी रात्री इतर भाविकांसाठी मोठे जेवण झाल्यानंतर आज गुरुवारी जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी तसेच अग्निदिव्य मार्गक्रमणासाठी सज्ज झालेले आहेत.

Related posts: