|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » आंतरजातीय विवाहातून तरुणावर गोळीबार

आंतरजातीय विवाहातून तरुणावर गोळीबार 

पुणे / प्रतिनिधी : 

बहिणीशी आंतरजातीय विवाह केल्याने दोघा भावांनी एका तरुणावर पिस्तूलातून पाच गोळय़ा झाडल्याची घटना बुधवारी रात्री पुण्यातील चांदणी चौकात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तिघांनी अटक केली आहे.

तुषार प्रकाश पिसाळ (वय 20, रा. राजेगाव, ता.भोर) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सागर लहू तावरे, आकाश लहू तावरे (वय 22, रा. राजे, ता.भोर), सागर रामचंद्र पालवे (वय 21) अशी अटक आरोपींची नावे आहेत.