|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » ममतादीदींची थप्पड हाही आशीर्वादच : नरेंद्र मोदी

ममतादीदींची थप्पड हाही आशीर्वादच : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

ममतादीदींची थप्पड हादेखील आपल्यासाठीच आशीर्वादच आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांना उद्देशून नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर मोदी म्हणाले, ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहे. चिटफंडच्या नावाखाली गोरगरिबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱया घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती, तर अधिक बरे वाटले असते. आज ममतादीदींना इतके भयभीती व्हावे लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.