|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » स्टेट बँकेला तिमाहीत 838 कोटींचा नफा

स्टेट बँकेला तिमाहीत 838 कोटींचा नफा 

नवी दिल्ली :

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने 2018-19 च्या चौथ्या तिमाहीत 838.40 कोटी रुपयांचा नफा नोंद केला आहे. बुडीत कर्जच्या एनपीए स्तरात घसरण झाल्यामुळे हा फायदा झाल्याची माहिती एसबीआयने शुक्रवारी दिली. बँकेला 2017-18 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत 7718.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होती. यावेळी मार्च तिमाही उत्पन्नात सुमारे 11 टक्क्यांची वाढ होत 75670.50 कोटी झाले आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत उत्पन्न 68436.06 कोटी रुपये होते. पूर्ण आर्थिक वर्ष (एप्रिल-मार्च) 2018-19 मध्ये बँकेला 3069.07 कोटी रुपयांचा नफा झाला तर 2017-18 मध्ये 4187.41 कोटी रुपये इतका तोटा झाला होता. याच दरम्यान, एसबीआयच्या सर्व कंपन्यांचे उत्पन्न 3.30 लाख कोटी रुपये झाले, जे 2017-18 मध्ये 3.01 लाख कोटी रुपये होते. मार्च 2019 च्या शेवटी बँकेचा एकूण एनपीए घट होऊन एकूण कर्ज 7.53 टक्क्यांवर होते. मार्च 2018 च्या शेवटी एकूण एनपीए 10.91 टक्के होते.