|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोन्सेरातच्या उमेदवारीमुळे पणजीतील महिला सुरक्षिततेचा प्रश्न

मोन्सेरातच्या उमेदवारीमुळे पणजीतील महिला सुरक्षिततेचा प्रश्न 

पणजी :

काँग्रेस पक्षाने पणजी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडलेल्या बाबुश मोन्सेरात यांचा सर्वांनाच परीचय आहे. 2016 मध्ये घडलेली घटना ही सर्व गोमंतकीयांना अजुनही ज्ञात असून त्यामुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय पातळीवर बदनाम झाले होते. मोन्सेरात यांनी काँग्रेस पक्ष 3 वेळा सोडला तरीही त्याचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे तीन माजी मुख्यमंत्री हजर होते. सुरेंद्र फ्gढर्तादो व यतीन पारेख यांना डावलून मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने पणजीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे प्रतिपादन भाजप महीला मोर्चा उपाध्यक्ष कुंदा चोडणकर यांनी केले.

यावेळी पत्रकार परिषदेत नगरसेविका वैदेही नाईक, बालभवनच्या अध्यक्ष शीतल नाईक, रेखा कांदे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता भिंगी आणि दिक्षा माईणकर यांची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असताना पणजी सुरक्षित होती परंतु मोन्सेरात यांना उमेदवारी दिल्याने आता या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पणजी आम्हाला ताळगांव करायची नाही असेही कुंदा चोडणकर म्हणाल्या.

पार्रीकर यांचा निर्णय चुकीचा : कुंदा चोडणकर

बाबुश मोन्सेरात हे चांगले व्यक्ती नाही असे जर भाजप महिला मोर्चाचे म्हणणे आहे तर ज्यावेळी पर्रीकर सरकारने मोन्सेरात यांना जीपीपीडीएचे अध्यक्षपद दिले त्यावेळी भाजप महिला मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन त्याला विरोध का केला नाही. त्यावेळी सर्व महिला सुरक्षित होत्या का असे प्रश्न विचारले असता कुंदा चोडणकर म्हणाल्या की 2017 साली युतीचे सरकार होते. यावेळी पर्रीकर यांनी जीपीपीडीएचे अध्यक्षपद बाबुश मोन्सेरात यांना दिले तो त्यांचा निर्णय सध्या आम्हाला वैयक्तिकरित्या चुकीचा वाटत आहे.

Related posts: