|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. दि. 12 ते 18 मे 2019

मेष

वृषभ  राशीत सूर्य, बुध प्रवेश तुमच्या कार्याला मदत करणारा ठरेल.  तुमचा आत्मविश्वास वाढेल. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुमचे विचार पटतील.  नोकरीतील ताण कमी होईल. वरि÷ तुमचे कौतुक करतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. पुरस्कार मिळेल. कोर्टकेसमध्ये बुधवारी, गुरुवारी सावध रहा. वाद वाढवू नका. वाटाघाटीत यश मिळेल. सर्व सोपे नाही हे लक्षात ठेवा.


वृषभ

तुमच्याच राशीत सूर्य, बुध प्रवेश झाल्याने तणाव व वाद कमी होईल. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात आशेचा किरण दिसेल. विचारांना चालना मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. कला, क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. झगडून यश येईल. कोर्टकेसमध्ये यशाच्या जवळ जाल. घरात क्षुल्लक नाराजी होईल.


मिथुन

वृषभ राशीत सूर्य, बुध, प्रवेश करीत आहे. दादागिरीची भाषा चालणार नाही. संयमाने प्रश्न सोडवा. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात दबाव वाढेल. तुमचा मुद्दा बाजूला ठेवला जाऊ शकतो. धंद्यात लक्ष द्या. काम टिकवून ठेवा. कोर्टकेस हुशारीने चालवा. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. घरातील वातावरण चांगले राहील.


कर्क

वृषभेत सूर्य, बुध प्रवेश, प्रत्येक दिवस, तुम्हाला यश देणारा ठरेल. प्रयत्न, जिद्द ठेवा. संयम ठेवा. रागावर ताबा ठेवा. म्हणजे सर्वत्र तुमचे वर्चस्व राहील. धंद्यात जम बसेल. येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. वाटाघाटीत यश येईल. गुप्त कारवाया होत राहतील. त्याला कमी समजू नका. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. शेतकऱयांना जोडधंदा मिळेल. नुकसान सावरता येईल. नोकरीत बदल करता येईल.


सिंह

वृषभेत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या  महत्त्वाच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात सुधारणा होईल. चांगले नोकर माणसे शोधता येतील. राजकीय, सामाजिक कार्यात यश मिळेल. वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. घरातील समस्या कमी करण्यासाठी  शक्तिपेक्षा युक्ती वापरा. दुसऱयाचा विचार समजून घ्या. कला, क्रीडा साहित्यात प्रगती होईल. ओळखी वाढतील. कोर्टकेस जिंकता येईल. शेतकऱयाला दिलासा मिळेल.


कन्या

वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. रविवार, सोमवार घरात चिंताजनक वातावरण राहील. वाद वाढवू नका. धंद्यात वाढ, सप्ताहाच्या शेवटी होईल. धीराने प्रश्न सोडवा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव टिकून राहील. अधिकार मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात महत्त्व राहील. जवळच्या लोकांना दुखवू नका. कोर्टकेस जिंकाल. शेतकरी वर्गाला चांगला मार्ग मिळेल. व्यसनाने नुकसान होईल.


तुला

वृषभ  राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात व्यवहार करताना सावध रहा. हिशोब चुकण्याची शक्मयता आहे. तुमचे बोलणे फार नम्र ठेवा. तुमचा मुद्दा राजकीय, सामाजिक क्षेत्रात पटवून देणे कठीण आहे. वरि÷ांची मर्जी पाहून बोला. यशासाठी झगडा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठोर असेल. कोर्टकेस सोपी नाही. मदतीची अपेक्षा ठेवू नका. योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने महत्त्वाचा निर्णय घ्या. घरातील व्यक्ती मदत करतील.


वृश्चिक

वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. या सप्ताहात संधी मिळण्यास थोडा विलंब होईल. विरोधक तणाव करतील. घरातील कामांची गर्दी होईल. मतभेद होतील. राजकीय, सामाजिक कार्यास संमिश्र स्वरुपाचे वातावरण राहील. तडजोड कशी करावयाची याचा विचार करता येईल. धंद्यात वाढ होईल. कामाला सुरुवात होईल. कला, क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. कोर्टकेस आशा वाढवणारी ठरेल. केस लवकरच संपवता येईल.


धनु

वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला  करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा टिकवावी लागेल. सहकारी मदत करतील. अरेरावी करू नका. धंद्यात मिळेल ते काम घ्या. नोकरांना सांभाळून ठेवा. संसारात जबाबदारी वाढेल. कुणाला  दुखवू नका. नोकरीच्या ठिकाणी कामात लक्ष ठेवा. चूक होईल. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. तडजोड करावी लागेल.


मकर

वृषभेत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. रविवार, सोमवार रागावर ताबा ठेवा. पुढे सर्व कामे सुरळीत होतील. धंद्यातील समस्या  सोडवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. टिका होईल. लोकप्रियताही मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात नामांकन होईल. मागील येणे वसूल करा. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. पुढे त्रास होईल.


कुंभ

वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश  होत आहे. तुमचा उत्साह कायम राहील. घरातील प्रश्न बुधवार, गुरुवार वाढेल. शेजारी त्रास करतील. जबाबदारी घ्यावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात मतभेद होतील. तुमचा विचार खासगीत मांडा. कला- क्रीडा क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. कोर्टकेसमध्ये योग्य सल्ला घेऊनच बोला.


मीन

वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. या आठवडय़ात कामाचा व्याप वाढेल. धंदाही वाढेल. धावपळ होईल. अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा राहील. वाटाघाटीत फायदा होईल. पदाधिकार मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार मिळेल. आर्थिक लाभ होईल. कोर्टाच्या कामात अडचणी येतील.