|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुष्काळग्रस्त भागात सावंतवाडीतून चारा

दुष्काळग्रस्त भागात सावंतवाडीतून चारा 

तीन गाडय़ा पाठविल्या, आणखी पाठविणार

वार्ताहर / ओटवणे:

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनावरांचे पाण्यासह चाऱयाचे हाल होत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर पाणी चाऱयासाठी होरपळलेल्या जनावरांचे हाल पाहून  जि. प. चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी  दुष्काळग्रस्त सातारा जिह्यातील जनावरांसाठी दहा गाडय़ा चारा पाठविण्याचा संकल्प केला. त्यानुसार चाऱयाच्या एकूण तीन गाडय़ा पाठविण्यात आल्या आहेत.

कोणत्याही संकटात धावून जाणारे म्हणून मंगेश तळवणेकर यांची ख्याती आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळामुळे पाण्यासह चाऱयासाठी जनावरे तडफडत आहेत. ही स्थिती पाहून तळवणेकर यांनी जनावरांसाठी चारा पाठविण्याचा निश्चय केला. त्यानंतर ग्रामीण भागात जाऊन जनावरांना चारा देण्याचे आवाहन केले.
शेतकरी व दानशूर व्यक्तींनी या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य केले.

ग्रामीण भागातून चारा गोळा झाल्यानंतर चाऱयाच्या दोन गाडय़ा चार दिवसापूर्वी  सातारा जिह्यात पाठविण्यात आल्या. त्यानंतर गुरुवारी रात्री मंगेश तळवणेकर यांच्या पुढाकाराने चाऱयाची एक गाडी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व देवसू वनपाल तथा पारपोली संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे एस. के. आरेकर यांच्या वतीने एक गाडी पाठविण्यात आली 

तळवणेकर यांच्या आवाहनाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत   आहे. अजूनही चारा शिल्लक आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थेसाठी पुढे यावे, असे आवाहन तळवणेकर यांनी केले आहे. त्यासाठी 9421269444 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.