|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विठुचरणी 11 हजार आंब्यांची आरास

विठुचरणी 11 हजार आंब्यांची आरास 

रविवारपासून विठ्ठलाच्या अन्नछत्रात आमरस

प्रतिनिधी /  पंढरपूर

राज्यामधे एकीकडे उन्हाळय़ामुळे आंब्याची रेलचेल सुरू असताना. दुसरीकडे आज विठ्ठल मंदिरात पुणे येथील भक्ताने तब्बल 11 हजार रत्नागिरी हापूस आंब्याचा नैवैद्य विठ्ठलास दाखवला. विशेष म्हणजे या आंब्याची आज विठ्ठलास आरास करण्यात आली होती. आंब्याचा पुढील चार दिवस मंदिराच्या अन्नछत्रात भक्तांना आमरस रूपात आस्वाद घेता येणार आहे.

आंबा हा फ्ढळाचा राजा समजला जातो. उन्हाळा आला की आंब्याची चाहूल सुरू होते. अशातच आंब्याचा दरवळही उन्हाळय़ामध्ये सामान्यांना सुखावून जातो. यातच आज वैष्णवांचे आणि सकल संताच्या माहेरघरी अर्थात विठुरायाच्या मंदिरातही आंबा दिसून आला. विठ्ठलाचे मंदिर म्हणजे सदासर्वकाळ प्रसन्नतेची चाहूल देणारे स्थान. याच ठिकाणी आज विठुरायांच्या प्रसन्नतेच्या वातावरणासोबतच आंब्याचा सुगंधही भक्ताना अनुभवायला मिळाला.

पुणे येथील व्यापारी विनायक कंची यांनी हे आंबे विठ्ठलचरणी नैवैद्य म्हणून अर्पण केले आहेत. सुमारे 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचे हे आंबे आहेत. हे आंबे शुक्रवारी पंढरीत आणल्यावर या आंब्याची आरास करण्यात आली. यासाठी 100 हून अधिक विठ्ठलभक्तांनीं सात तास परिश्रम घेत आंब्याच्या पानासह मंदिरामधे आरास उभी केली.

आज सकाळपासून आंब्यामध्ये सजलेला विठुराय पाहण्यासाठी भाविकांसह स्थानिक भाविकांनी देखिल मोठी गर्दी केली. या आंब्याचा आमरस करून विठ्ठलभक्तांना तो प्रसाद रूपाने दिला जाणार आहे. यापूर्वी मंदिरामध्ये समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या संकल्पनेतून फ्gढलांची आरास केली जात होती. मात्र यंदा प्रथमच आंब्याची आरास केली गेली आहे. प्रतिवर्षी अक्षयतृत्तीयेला पुणे येथील दगडूशेठ गणपतीला अशी आंब्याची आरास केली जाते.

Related posts: