|Monday, December 9, 2019
You are here: Home » मनोरंजन » उन्हाळा रंगे, डेझर्ट्सच्या संगे !!!

उन्हाळा रंगे, डेझर्ट्सच्या संगे !!! 

सध्या उन्हाचा तडाखा फार वाढलेला असल्याने सेटवर काम करणाऱया आपल्या लाडक्या कलाकारांची काळजी असणाऱया प्रेक्षकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ‘झी युवा’च्या सेटवरील कलाकारांनी या उष्णतेचा त्रागा करून न घेता त्यावर उत्तम उपाय शोधले आहेत. आमरस, आईक्रीम, कुल्फीसारख्या डेझर्ट्सचे पर्याय निवडून हा उन्हाळा चक्क साजरा करण्यात येत आहे. उन्हाने अंगाची काहिली होत असताना कलाकार मात्र सेटवर आनंदाने थंडगार डेझर्ट्सचा आस्वाद घेतायेत. उन्हाच्या त्रासाने हैराण होण्याऐवजी थंड डेझर्ट्सचा आनंद संपूर्ण सेटवर वाटण्याची कल्पना कलाकारांनी अंमलात आणली आहे.

‘साजणा’ या मालिकेचे चित्रीकरण एका गावाच्या सेटवर होते. त्यामुळे एसी आणि पंख्यांची सोय नेहमीच होऊ शकत नाही. पण, यावरील उपाय म्हणून थंडगार आमरस खाण्याचा पर्याय कलाकारांनी निवडला. आंबे आणि आमरस यांच्यावर आडवा हात मारताना हे कलाकार दिसून आले. ‘एक घर मंतरलेलं’च्या सेटवर या डेझर्ट्सच्या बाबतीतही ‘मंतरलेलं’ वातावरण पाहायला मिळाले. मुख्य कलाकार सुरुची आडारकर आणि सुयश टिळक यांनी उन्हाळय़ाचा सामना करण्यासाठी आईक्रीमचा पर्याय निवडला. जेवणानंतर आईक्रीम खात असलेले हे दोघेजण, अवघ्या एका आईक्रीमने समाधान होत नसल्याचे आवर्जून सांगतात. 

‘फुलपाखरू’मधील सर्वांची लाडकी वैदेही, अर्थात हृता दुर्गुळे उष्णतेचा सामना करण्यासाठी ताक पिणे पसंत करते. हृताचा सहकलाकार यशोमनने मात्र पाण्याच्या प्रेचा पर्याय निवडलाय. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चेहऱयावर सतत थंड पाण्याचा मारा करत राहणे त्याने पसंत केले आहे. तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार कुल्फीप्रेमी आहेत. उन्हाळय़ातला थंडावा म्हणून कुल्फी खाण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारलेला दिसतो. एवढेच नाही तर सेटवरच्या सगळय़ांचीच या उन्हाच्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून सर्वांसाठी कुल्फी पार्टीचा बेत या दोघांनी मिळून आखला.

Related posts: