|Sunday, May 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » महानायका’सोबत झळकला राहुल पेठे

महानायका’सोबत झळकला राहुल पेठे 

मराठी चित्रपटसफष्टीतील अभिनेता राहुल पेठेने हिंदी वेबसीरिज, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता राहुल बॉलीवुडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीतून झळकला आहे. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कारकिर्दीत अशा ‘महान’ कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा ही असतेच आणि राहुलची ही इच्छा ‘कौन बनेगा करोडपती’ या जाहिरातीच्या माध्यमातून पूर्ण झाली. आपल्या या अनुभवाबद्दल राहुल म्हणतो, इतके मोठे अभिनेता असूनही ‘मी’ पणाचा लवलेश त्यांच्यात जराही नव्हता. त्यांचे अफाट व्यक्तिमत्व आहे. अशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी आमचे दिग्दर्शक विजय मौर्य सरांना धन्यवाद देईन.

राहुलचा नुकताच ‘15 ऑगस्ट’ नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. लवकरच राहुल ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या निमित्ताने तो पुन्हा एकदा मफण्मयी देशपांडेसोबत पडद्यावर झळकणार आहे.

Related posts: