|Sunday, May 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » अण्णा साकारण्यासाठी घेतली मेहनत : माधव अभ्यंकर

अण्णा साकारण्यासाठी घेतली मेहनत : माधव अभ्यंकर 

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झालीय.

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारतायत. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये त्यांच्या वाटय़ाला खूपच छोटीशी भूमिका आली होती. पण या सिझनमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही भूमिका साकारणे हे त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. माधव अभ्यंकर  त्यांच्या या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले की, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अण्णा या भूमिकेसाठी मला वजन कमी करणे गरजेचे होते. मी केवळ महिन्याभरात सात ते आठ किलो वजन कमी केले. त्यासाठी मला डाएट करावे लागणार होते. मला डाएट प्लान आखून देण्यात आला होता आणि तोच मी फॉलो करत असे. मालिकेसाठी वजन कमी करण्यासोबतच एक मोठे आव्हान माझ्यासमोर होते आणि ते म्हणजे भाषा शिकण्याचे. ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील संवादांमध्ये अनेक ‘मालवणी’ शब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या भाषेवर मला मेहनत घ्यावी लागली. माझी काकी मालवणी भाषेत बोलायची. त्यामुळे ही भाषा माझ्या कानावर पडलेली होती. पण मी अनेक वर्षे पुण्यात राहिलो असल्याने मला ही भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे मी अनेक मालवणी नाटके बघितली. त्याचा भाषा सुधारण्यासाठी मला प्रचंड फायदा झाला.

Related posts: