|Friday, February 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » रोहित राऊतचे ‘मनमोहिनी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

रोहित राऊतचे ‘मनमोहिनी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला 

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमके काय काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘मोगरा फुलला’मधील श्रवणीय असे ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून याला प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी बरोबर सई देवधर हा नवोदित चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील आणि सई यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related posts: