|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात 242 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

वेंगुर्ल्यात 242 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन 

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले येथे रविवारी 242 दिवस प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाची मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली. यावेळी असंख्य भाविकांनी या गणपतीचे दर्शन घेतले. वेंगुर्ले शहरातील कुबलवाडा-एकमुखी दत्तमंदिरानजीकचे गुंडू दामले यांच्या निवासस्थानी 242 दिवस गणपतीचे पूजन करण्यात आले. रविवारी सायंकाळनंतर ढोल-ताशांच्या गजरात बाजारपेठेतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.