|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तर….आकाशाला गवसणी

तर….आकाशाला गवसणी 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

भारतातील सर्वात उंच निवडुंग म्हणून लिमका बुकमध्ये ज्याची नोंद झालेली आहे, त्या महाबळेश्वर येथील  निवडुंगाची दुसरी पिढी आकाशाला गवसणी घालण्यासाठी सध्या प्रयत्नशील असून काही महिन्यापूर्वी मूळ निवडुंगाच्या तळातून फुटलेल्या तीन कोंबांची सध्या वेगाने वाढ होत आहे. तीन पैकी सर्वात मोठा  कोंब सुमारे 11  फुट ,दुसरा 9 फ़ुट  तर तिसरा सुमारे 6 फुट उंच झेलला आहे . हि  तिन्ही निवडुंगाची रोपे  आता  वेगाने आकाशाकडे झेपावत असून (आपल्या वडिलांचाच )मूळ निवडुंगाच्या  उंची बाबतचा विक्रम मोडणार का? या बद्धल कुतुहल निर्माण झाले असून त्यावर  या परिसरातील निसर्गप्रेमी व निवडुंग प्रेमी लक्ष ठेवून आहेत .

    महाबळेश्वरमध्ये सुमारे 50 वर्ष जुनी शासकीय दुग्धशाळा आहे .सध्या हि दुग्धशाळा बंद आहे. गेले 8- 10 वर्षांपासून ती मृतावस्थेत आहे.असे असले तरी या दुग्धशाळेत अनेक विक्रम घडले आहेत . दुग्धशाळा  बंद असून काम न करता अधिकारी व कर्मचारी यांचा नियमित  पगार निघणारी दुग्धशाळा म्हणून सध्या हि दुग्धशाळा परिचित आहे. तर याच शासकीय दुग्धशाळेच्या विश्राम गृहाच्या प्रवेशद्वाराजवळच सुमारे 47 फुट उंचिचा  निवडुंग आहे . तो 37 फुट उंचीचा असताना 2007 साली भारतातील सर्वात उंच निवडुंग म्हणून याची नोंद लिमका बुक ओफ रेकार्डमध्ये झाली आहे . त्याचा हा विक्रम आजही कायम असून आज तागायत त्याचा हा विक्रम कोणी मोडू शकला नाही.असे असले तरी 

   निसर्ग नियमानुसार आत्ता हा लिमका वीर वार्धक्याकडे झुकू लागला आहे.त्याचा सर्वात वरचा शेंडा वाकडा झाला असून वरची सालही सुकुन गेल्या सारखी दिसत  आहे .मात्र आतील  खोडाचा बराचसा भाग अध्यापही कणखर आहे . आज हि तो वार्धक्यातही ताठ  मानेने उभा आहे.तसेच तो आपल्या नवीन पिढीकडे मोठय़ा आशेने पाहत असल्याचे चित्र आहे. निवडुंगाच्या फांद्या अध्याप तरतरीत असून आजही मे महिन्याच्या शेवटी शेवटी त्यांना ब्रम्हकमळासारखी पांढरी ,मोठ मोठाली , सुंदर व आकर्षक फुले येऊन तो बहरतो.दरम्यान काही महिन्यांपूर्वीच या लिमका बुक वीराने  तीन नवीन कोबांना जन्म दिला होता . हे कोंब मुळ निवडुंगाच्या तळातून फुटल्याने त्यांच्या  बद्धलचे कुतूहल वाढले होते .तसेच त्यावर निसर्गप्रेमी लक्ष ठेवून होते व आजही आहेतच. हे तीन हि कोंब सध्या वेगाने वाढत असून यातील एक कोंब  6  फुट ,दुसरा 9 फ़ुट  तर तिसरा त्यातल्यात्यात म्हणजे सुमारे 11 फुट उंच झालेला आहे.  

                सध्याची त्यांच्या वाढीची प्रगती पाहता भविष्यात हे कोंब आपल्या मुळ निवडुंगाचा  उंचीचा विक्रम मोडणार का ?अशी शंका अभ्यासकांना  व त्याला पाहणायाना  वाटत आहे. जेव्हा तो स्व:ताच्याच मूळ निवडुंगाच्या उंचीचा विक्रम मोडेल त्यावेळी त्यांचे बालपणचे व विविध टप्प्यातील साक्षीदार होण्यासाठी व ते अभिमानाने सांगता यावे यासाठी विविध निसर्ग प्रेमी व निवडुंग अभ्यासकांची ते पाहण्यास व त्याची आपल्या समवेत छबी काढण्याची लगबग सध्या सुरु असल्याचे येथील अनोखे चित्र आहे. कारण 30 वर्षापूर्वी जेव्हा मुख्य निवडुंगाचा कोंब या दुग्धशाळेच्या विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारा जवळ उगवला (आला )त्यावेळी तो एवढा उंच वाढून काहीतरी विक्रम प्रस्तापित करेल हे कोणाच्याहि स्वप्नातही आले नव्हते म्हणूनच त्यावेळचे या निवडुंगाचे त्याच्या बालपणीचे फोटो आज  कोणाकडे नाहीत. कारण निवडुंग हि वनस्पती वाळवंटासारख्या अति उष्ण प्रदेशात सहसा पहावयास मिळणारी व वाढणारी वनस्पती असून ती महाबळेश्वर सारख्या डोंगराळ,अति पावसाच्या ठिकाणी व पर्यटनस्थळी ती एवढीवाढू शकेल यावर तत्कालीन नागरिकांचा विश्वासच नव्हता .त्यामुळेच त्याचे लहानपणचे  रोपटय़ाच्या अवस्थेतील फोटो दुरापास्त असावेत .मात्र आता तरी पूर्वीचीच चूक पुन्हा  न करता निसर्गाने दिलेली  हि संधी आपण घालवू नये असे  निवडुंग अभ्यासकांना ,निसर्ग प्रेमी ,वनस्पती अभ्यासक यांना वाटत असून त्यानुसार ते या लिमकाबुक विरासह  त्याच्या तिन्ही सातत्याने वाढणाया व गगनास गवसणी घेण्याच्या प्रयत्नांत असलेल्या (कोंबांवर)रोपांवर व त्याच्या फांद्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच त्यांच्या सह आपली विविध टप्प्यातील छायचित्रे काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे सध्याचे येथील अनोखे पण  सुखद  चित्र पहावयास मिळत आहे.