|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सुरू होणार बदलीसाठी सखाराम मास्तरांच्या शाळा

सुरू होणार बदलीसाठी सखाराम मास्तरांच्या शाळा 

खोटी कागदपत्रे रंगवण्यात मास्तर सावजांच्या शोधात

प्रतिनिधी / सातारा

शासन शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने करत आहे.मात्र आपल्याला जवळची, चांगली शाळा कशी मिळेल यासाठी गतवर्षी शिक्षक कशा शाळा करतात याची उदाहरणे बदली करणाया अधिकायांना याची डोळा पहायला मिळाले. अजून ही गतवर्षीच्या त्या सखाराम मास्तरांच्यावर कारवाई लाल फितीत अडकली आहे. शासनाच्या गृह विभागाचे दि.13 रोजी शिक्षकांच्या जिल्हा अंर्तगत बदलाच्या अनुषंगाने फर्मान निघाले आहे.त्यामुळे यावर्षी बदली चांगल्या ठिकाणी मिळवायचीच यासाठी आता सखाराम मास्तरांच्या धडपडी सुरू होतील.त्या आदेशानुसार 21 पासून हरकती निवारण कारवाही सुरू होणार आहे.

शिक्षक वर्ग म्हणजे उद्याची पिढी घडवणारा वर्ग आहे. मात्र या वर्गाला चांगल्या ठिकाणी, चांगल्या गावात शाळा असावी असा स्वच्छ हेतू बहुतेक सर्व शिक्षकांचा असतो.त्यातल्या त्यात शहराजवळील शाळा मिळाली तर उत्तम होते.गेल्या पाच वर्षांपूर्वी बदल्यांचे अधिकार हे स्थानिक पातळीवरील नेत्याच्या हाती असायचे.त्यामुळे जो शिक्षक पुढायांची हाजी हाजी करेल त्याची योग्य बदली असायची.शिक्षक संघटनांच्या नेत्यांच्या बदल्या बहुतांशी होतच नसतं. या बदल्यात होत असलेला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी शासनाने हळूहळू बदल करत आणले.ऑनलाइन पद्धतीवरून ही थेट 27 फेब्रुवारी 2017 च्या आदेशानुसार बदली प्रक्रिया होऊ लागली.परंतु जेवढय़ा तुम्ही चांगल्या बाबी कराल तेवढेच फाटेही फुटले जातात.गतवर्षी सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने बदली प्रक्रिया राबवली.अनेक शिक्षकांनी अवघड शाळा सुलभ दाखवली, अंतराचा दाखला चुकीचा जोडला, वैधकीय प्रमाणपत्र चुकीचे जोडले गेले, काहींनी चुकीच्या तक्रारी ही केल्या.त्यावर सूनवणीही झाली.अजून दोषी शिक्षकांच्या फाईली अधिकायांच्या टेबलावर तशाच आहेत. तर यावर्षी राज्याच्या ग्रह विभागांचे सोमवारी आदेश काढला आहे.8 मार्च आणि 22 मार्च च्या पत्रानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने 13 रोजी आदेश काढला आहे.बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा, यांच्या याद्या घोषित करण्यात येऊन त्यानुसार संगणकीय प्रणाली वर नौदणी करण्याचे कळवले होते.त्यानुसार 20 मे पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात यावी,अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्राची यादी घोषित करण्यात यावी, महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित करण्यात यावे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय यादी घोषित करावी, समाणिकरणासाठी रिक्त ठेवायच्या अनिवार्य जागांची यादी घोषित करणे असे असताना मागील वर्षी ज्या शाळा मध्ये समाणिकरणासाठी रिक्त ठेवण्यात आलेल्या जागा आहेत त्यामध्ये शक्यतो बदल करू नये, नवीन संच मान्यत्येमुळे जर बदल करणे अनिवार्य असेल तरच आशा शाळांमध्ये कंपल्सरी व्हकांशीमध्ये बदल करावा, शालानिहाय रिक्त जागा घोषीत कराव्या,21 मे पासून हरकत निवारणावर कार्यवाही सुरू करावी, असे फर्मान सोडले आहे.त्यामुळे जिह्यातील बदली पात्र शिक्षक अगोदरच जाळे टाकून तयार झाले आहेत.सावज शोधू लागले असून गतवर्षी प्रमाणे यावर्षी शिक्षक बोगसगिरी करणार का?, की सातारा जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छ बदली प्रक्रिया राबवणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.