|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सौदी अरेबियाच्या तेलवाहू टँकर्सवर हल्ला

सौदी अरेबियाच्या तेलवाहू टँकर्सवर हल्ला 

अमेरिका-इराण तणावाची पार्श्वभूमी : मध्यपूर्वेत नव्या संघर्षाची चिन्हे, हल्ल्यात हात नसल्याचा इराणचा दावा

वृत्तसंस्था/ रियाध

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढला असतानाच सौदी अरेबियाच्या तेलवाहू टँकर्सवर हल्ला झाला आहे. संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) सागरीक्षेत्रात आपल्या 2 तेलवाहू टँकर्सना लक्ष्य करण्यात आल्याने मोठे नुकसान झाल्याचे सौदीने सोमवारी म्हटले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी स्वतःचा प्रस्तावित मॉस्को दौरा रद्द करत इराणबद्दल युरोपीय अधिकाऱयांशी चर्चा करण्यासाठी ब्रुसेल्समध्ये धाव घेतली असताना हा प्रकार घडला आहे.

तर इराणने आखाती क्षेत्रांमध्ये नौकांवरील हल्ल्यांना चिंताजनक ठरवत चौकशीची मागणी केली आहे. सागरी सुरक्षा भंग करण्याचे दुस्साहस विदेशी घटकच करू शकतात, असे इराणने म्हटले आहे. इराणकडून निर्माण झालेल्या कथित धोक्याला तोंड देण्यासाठी अमेरिकेने आखातात बी-52 बॉम्बवर्षक विमाने तैनात केली आहेत.

सुरक्षा धोक्यात : सौदी अरेबिया

सौदी अरेबियाने (इराणचा कट्टर विरोधक) या हल्ल्यांची निंदा केली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या सागरी क्षेत्रात सौदीच्या वाणिज्यिक आणि नागरी नौकांना लक्ष्य करण्यात आले आहे. गुन्हेगारी कृत्यामुळे सागरी सुरक्षेबद्दल गंभीर धोका निर्माण झाला असून यामुळे आंतरराष्ट्रीय शांततेवरही प्रतिकूल प्रभाव पडणार असल्याचे सौदीने म्हटले आहे. अनेक देशांच्या 4 वाणिज्यिक जहाजांवर फुजैरा शहरानजीक हल्ले करण्यात आल्याचे युएईकडून सांगण्यात आले. दोन टँकर्सना मोठे नुकसान पोहोचले असले तरीही कुणीही जखमी झालेले नाही, असे सौदीने म्हटले आहे.

महत्त्वाचा सागरीमार्ग

फुजैरा बंदर हे अरबी समुद्राच्या किनाऱयावर स्थित युएईचे टर्मिनल असून या मार्गाद्वारे आखातातील तेलाची निर्यात होते. अमेरिकेसोबतचा सैन्य तणाव वाढल्यास होर्मूझ सामुद्रधुनी मार्ग बंद करण्याची धमकी इराणने वारंवार दिली आहे. तेलवाहू टँकर्सवरील हल्ल्यांमागे कोण असू शकतो, याची माहिती युएईने दिलेली नाही. शक्तिशाली देशांनी सागरी वाहतूक सुरक्षित करण्यास सहकार्य करावे असे आवाहन युएईने केले आहे. 

इराणकडून चिंता व्यक्त

हल्ल्याची घटना आणि याच्या संभाव्य परिणामांबद्दल इराणच्या विदेश मंत्रालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. प्रादेशिक सुरक्षा नष्ट करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय. विदेशी कट हाणून पाडण्यासाठी क्षेत्रीय देशांनी सतर्कता वाढविण्याची गरज असल्याचे इराणने म्हटले आहे. सौदी अरेबिया, इराक, युएई, कुवेत, कतार आणि इराणच्या बहुतांश तेलाची निर्यात होर्मूझ सामुद्रधुनीद्वारे होते आणि हा आकडा किमान 15 दशलक्ष बॅरल्स प्रतिदिन इतका प्रचंड आहे.

ब्रिटनचा इशारा

ब्रिटनचे विदेशमंत्री जेरेमी हंट यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यास आखातात आकस्मिक संघर्ष निर्माण होण्याचा इशारा सोमवारी दिला आहे. कुठल्याही देशाला संघर्ष नको असला तरीही या तणावाची अखेर एखाद्या संघर्षाप्रमाणेच होणार आहे. इराणला पुन्हा आण्विक सशस्त्राrकरणाच्या मार्गावर पाठवायचे आहे की नाही याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागणार आहे. इराण अण्वस्त्रसज्ज झाल्यास त्याच्या शेजाऱयांची महत्त्वाकांक्षाही बळावणार असल्याचे हंट यांनी युरोपीय देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना म्हटले
आहे.

Related posts: