|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तरुणाला सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तरुणाला सक्तमजुरी 

प्रतिनिधी/ सांगली

अल्पवयीन मुलीस दुकानात बोलावून घेत तिला अश्लिल छायाचित्र व †िव्हडीओ क्लिप दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. ए. पाटील यांनी सुनावली. अंकुश रामा शितोळे (20, रा. इंदिरानगर, मालगाव रोड, मिरज) असे या तरुणाचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. सौ. आरती देशपांडे-साटविलकर यांनी अंतिम युक्तिवाद केला.

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी भावासह अंगणामध्ये खेळत होती. त्यावेळी आरोपी अंकुश शितोळे याने तिला त्याच्या दुकानात बोलावून घेतले. मुलगी दुकानात आल्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलवरील अश्लील छाया†िचत्रे व व्हीडीओ क्लिप दाखवत वाईट वर्तन केले. मुलीने दुकानातून थेट आईकडे जात अंकुशने केलेल्या कृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आइने अंकुशला याबाबतचा जाब विचारला. तसेच त्याच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी अंकुशवर विनयभंग तसेच पोक्सो ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिश पाटील यांच्यासमोर इन पॅमेरा सुरु होती. यामध्ये पीडित मुलगी व तिची आई, वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणेचे न्याय सहाय्यक यांच्या जबाब ग्राह्य धरण्यात आला. व त्याला एक वर्षाची सक्तमजूरी व दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली. या खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. याशिवाय तपास अधिकारी शिल्पा दुथडे यांच्या जबाबाचाही विचार करण्यात आला. सरकार पक्षास पोलीस हवालदार रमा डांगे, पोना वंदना मिसाळ व पोकॉ माळकर यांचे सहकार्य लाभले.

Related posts: