|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बंधाऱयाची दुरुस्ती कधी होणार?

बंधाऱयाची दुरुस्ती कधी होणार? 

प्रतिनिधी/ वडूज

सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील रानमळा शिवारातील येरळा नदीवरील बंधाऱयाचा भराव फुटून मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. वर्षभरात या शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याचबरोबर अद्याप सदर बंधाऱयाची दुरुस्तीही झाली नाही. त्यामुळे या बंधाऱयाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करावी. तसेच तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी बाधित शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, सिध्देश्वर कुरोली येथील रानमळा शिवारातील बहुतांशी शेतकऱयांचे शेती हेच उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. जून 2018 मध्ये झालेल्या मोठय़ा पावसामुळे येरळा नदीपात्रास मोठा पूर आला होता. भवानी मंदिरानजीक असणाऱया येरळा नदीवरील बंधाऱयात दाऱयात मोठमोठी झाडे अडकल्यामुळे पुराचे पाणी भराव तोडून आजूबाजूच्या शेतकऱयांच्या शिवारात घुसले.

या पुरामुळे शिवलिंग बनसोडे, महादेव पोपट बनसोडे, संजय सावंता बनसोडे, किसन संजय बनसोडे, भानुदास नामदेव बनसोडे, वसंत शिवाजी बनसोडे, हणमंत शिवाजी बनसोडे, रघुनाथ गुलाबराव देशमुख, दादासाहेब पांडुरंग देशमुख, निवृत्ती जगन्नाथ बनसोडे, नामदेव जगन्नाथ बनसोडे आदी शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणावर उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यावेळी गांवकामगार तलाठय़ांनी या नुकसानीचे पंचनामेही केले होते. मात्र आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटूनसुध्दा अद्याप वरील शेतकऱयांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. याच पुरामुळे नुकसान झालेल्या दुसऱया बंधाऱया नजीकच्या काही शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाल्याचे समजते. तरी आम्हास अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. तसेच फुटलेल्या भरावाची दुरुस्तीही केली गेली नाही. आगामी काळात वळीवाचा मोठा पाऊस तसेच जून, जुलै मध्ये होणाऱया नियमित पावसाच्या पुरामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथशेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Related posts: