|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून जलसंधारणासाठी योगदान

आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून जलसंधारणासाठी योगदान 

प्रतिनिधी/ सातारा

माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी जलसंधारणाच्या कामासांठी गावोगावी श्रमदान करुन पाणी अडविण्याच्या लोकचळवळीत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. वॉटरकप स्पर्धेत उतरलेल्या गावांना त्यांनी यांत्रिक कामांसाठी आर्थिक मदतही दिली. 

माण तालुक्यात सध्या जलसंधारण कामांचे तुफान आले आहे. अनेक गावांनी पाण्याच्या बाबतील जलस्वयंपूर्ण होण्याचा निश्चय करत पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेतला आहे. आमदार जयकुमार यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गावोगावी श्रमदान करण्याचा शिरस्ता सुरु ठेवला आहे. मार्डी, गोंदवले, शिंदी बुद्रुकसह अनेक गावांना त्यांनी भेटी देत जलसंधारणाचे महत्व पटवून दिले. 

अनेक गावांमध्ये आमदार गोरे स्थानिक गावकऱयांच्या बरोबरीने अगदी चढाओढीने श्रमदान करत असल्याने गावकऱयांचा उत्साह वाढत आहे. मार्डी, गोंदवले येथे नागरिकांना संबोधित करताना आमदार गोरे यांनी दुष्काळी भागातील जनतेने टंचाईवर मात करण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला आहे. इथली स्वाभिमानी जनता आजपर्यंत दुष्काळाशी लढत आणि टंचाईशी दोन हात करत संघर्ष करत आहे. माण आणि खटावच्या मातीत सर्वप्रथम कॉंग्रेसच्या काळातच साखळी सिंमेंट बंधाऱयांचा प्रकल्प राबवून जलसंधारण कामांची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. 

आपल्या गावच्या  पाण्याचा ताळेबंद तयार करुन, पावसाचे पाणी अडवून आपले गाव जलस्वयंपूर्ण करण्यात प्रत्येक गावकऱयाने योगदान द्यावे, असे अवाहनही त्यांनी केले. जलसंधारणासाठी त्यांनी मदतही दिली.