|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी ‘हापूस’ ची दुबई वारी

रत्नागिरी ‘हापूस’ ची दुबई वारी 

 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

‘जीआय’ मानांकन मिळालेल्या प्रसिध्द हापूस आंब्याला लंडन, अमेरिका पॅनडा नंतर आता दुबईतून मोठी मागणी आली आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी येथील शेतकऱयांनी आपल्या बागेतील सेंद्रिय आंबा विदेशात पाठवण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी रत्नागिरी येथील हापूस निर्यात सुविधा केंद्रांच्या सहकार्याने 15 टन हापूस आंबा रत्नागिरी ते दुबई प्रवासाला निघाला आहे.

  जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा रंग त्याचा स्वाद यामुळे देश विदेशातील नागरिकांकडून हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी आतापर्यंत रत्नागिरी जिह्यातून 30 टन आंब्याची परदेशात निर्यात झाली आहे. येत्या दोन दिवसात 15 टन आंबा दुबईला पाठवण्यात येणार असल्याचे येथील पणन मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.   रत्नागिरी जिह्यातील हापूस आंब्याला विविध देशांमधून मागणी आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी येथील शेतकऱयांनी आपल्या बागेतील सेंद्रिय आंबा विदेशात निर्यातीस पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रत्नागिरी येथील हापूस निर्यात सुविधा केंद्राकडून शेतकऱयांना सहकार्य केले जात आहे.

  रत्नागिरीतून दुबईला 5 टन हापूस आंबा येथील हापूस निर्यात सुविधा केंद्रातून सानप नर्सरी प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांनी सोमवारी पुन्हा एकदा रवाना केला केला आहे. पुढील दोन दिवसात सांगली येथील निर्यातदार दुबईला एकूण 15 टन आंबा पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरवर्षी रत्नागिरी जिह्यातून युरोप, अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलिया या देशात आंब्याची निर्यात केली जाते. यातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. यंदाही युरोप आणि अमेरिकेत आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.

   या निर्यातीसाठी हापूस आंबा पावस, लांजा, रत्नागिरी, शिरगाव, पोमेंडी आणि राजापूर येथील शेतकऱयांनी दिला आहे. आज पर्यंत निर्यात झालेला हापूस आंबा तोषिब काजी, शिराज नेवरेकर, मुकादम, महेश आंब्रे, हुसेन आग्रे, प्रदीप आंब्रे, नागपाल अनिकेत हर्षे आदी शेतकऱयांच्या बागायती भागातील पाठवण्यात आला आहे. हे आंबे पाठवण्यासाठी पणन उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, सहाय्यक पणन अधिकारी गणेश पाटील, सह सहाय्यक पणन अधिकारी मिलिंद जोशी, सदगुरु इंटरप्राईजेसचे पॅक हाऊस मॅनेजर विश्व पाल मोरे यांचे योगदान लाभल्याचे सांगण्यात येत आहे. निर्यातदार तेजोमय घाडगे, ग्रो इन इंडिया व जितेंद्र नेमाडे, तुषार वाबळे या शेतकऱयांच्या संयोगाने ही निर्यात शक्य झाली आहे.