|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

विद्यार्थ्यांनो कॉलेज शिक्षणाचा निर्णय जपून घ्या

बुध. दि. 15 ते 21 मे 2019

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशाचे वेध लागतात. मित्र- मैत्रिणी घेतात म्हणून आपण तेच शिक्षण घ्यायचे असे मुले- मुली म्हणत असतात. पण तसे चुकूनही करू नका. स्वत:च्या मनाला जे पटेल तेच शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घ्या. अनेक शिक्षणसंस्था मुलांना निरनिराळी आमिषे दाखवितात. शिक्षण झाल्यावर नोकरीची हमी देतात. फीमध्ये सवलत, वसतीगृहे, मोफत बससेवा, आरामदायी व आल्हाददायक वातावरण असा भुलभुलैय्या निर्माण करतात, पण पूर्वीचे काही अनुभव पाहता अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे. चार पाच लाख रुपये खर्चुन शिक्षण घेतलेले लोक अजून बेकारच आहेत. खासगी शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्याना सरकारी नोकऱया मिळत नाहीत. उच्च गुणवत्तेचा दर्जा नसल्याने कॅम्पस सिलेक्शन होत नाही. मुलांनाही कमी श्रमात चांगले यश व गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱया हव्या असतात. शिक्षणासाठी कष्ट घेणे कुणालाही नको असते, पण नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सुरुवातीलाच जर योग्य निर्णय घेतला तर नंतर त्रास होणार नाही. आपल्या मुलांचा कल कोणत्या शिक्षणाकडे आहे, माता पित्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, मुलांना शिकवण्याचा खर्च, तसेच त्या शिक्षणाचा भावी आयुष्यात काही उपयोग होणार आहे का? याचाही विचार होणे आवश्यक आहे. सतत या ना त्या कारणाने विद्यार्थ्यांकडून मोठमोठय़ा रकमा  उकळणारी काही शाळा महाविद्यालये आहेत. खासगीसंस्था आहेत. काही संस्थेत घेतलेल्या शिक्षणामुळे प्लेसमेंट होत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. पालकांनीदेखील आपल्या  मुलांची बौद्धिक क्षमता काय आहे? त्यानी घेतलेले कोर्सेस त्यांना झेपतील की नाही, घरापासून कॉलेजचे अंतर किती आहे, बस पासेस व इतर खर्च आपल्याला झेपतील का, गाडय़ा असतील तर त्यांचा पेट्रोलचा खर्च, मुलांची सुरक्षितता, मध्येच आर्थिक अडचण आल्यास काय करणार, कॉलेजचा नावलौकिक कसा आहे, काही कॉलेजीस प्रति÷ित असतात, पण तेथे काय चालते. रॅगिंग, छळवाद, छानछोकी, तसेच मुलांचे वर्तन त्या कॉलेजात कसे असेल या साऱया बाबींचा पूर्ण विचार करून मगच संबंधित कॉलेजात प्रवेश घ्यावा. हल्ली सर्वांचा ओढा सायन्सकडे आहे, पण बारावीला बहुतांश मुले नापास होतात, असे अनुभव आहेत. त्यामुळे सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावा. ज्यांच्या जन्मपत्रिकेत शिक्षणस्थान बलवान असेल त्यांनी कोणतेही शिक्षण घेण्यास हरकत नाही, पण फक्त कुंडलीच न पहाता व्यावहारीक दृष्टिकोन बाळगणे हेही तितकेच खरे आहे. डॉक्टर असलेले लोक बिल्डरचा व्यवसाय करतात.इंजिनियर लोक कुठेतरी अकौटन्सी करीत बसलेले तर सायन्स पदवीधर नोकरी मिळत नाही म्हणून पडेल ती कामे करीत असतात. आपण ज्या पदव्या घेतो, त्यांचा तसा व्यवहारात फारसा उपयोग नसतो. आपले प्रत्यक्ष जीवन वेगळेच असते व पदोपदी याचे अनुभव येत असतात त्यामुळे जे शिक्षण घ्याल, त्याचा पुढे कितपत फायदा होणार या बाबीचाही विचार होणे आवश्यक आहे. वरील साऱया बाबींचा पूर्ण विचार करून मगच पुढील निर्णय घ्यावा. काही कोर्सेस अतिशय महागडे असतात. त्यासाठी लाखो रुपये घातलेले असतात मग ते पैसे वसुल करण्यासाठी अनेक नवनव्या कल्पना लढविल्या जातात, असे होऊ नये तुम्ही जे काही शिक्षण घ्याल त्याने तुमचे कल्याण व्हावे, तसेच त्या शिक्षणामुळे इतरांनाही रोजगार उपलब्ध क्हावा, चार लोकांचे कल्याण व्हावे, इतरांनीही तुमच्या शिक्षणाचे अनुकरण करावे, अशा प्रकारचे शिक्षण घ्यावे. तरच त्या शिक्षणाचे सार्थक होईल. जन्मकुंडलीत बुद्धी सहम म्हणून एक गणितीय संस्कार आहे. त्यानुसार शिक्षण घेतल्यास त्याचा जीवनात चांगला उपयोग होईल.

मेष

रवि धनस्थानी आहे हा विचित्र योग आहे. लाभ झाल्यास अनेक मार्गाने पण नुकसान झाल्यास तेही कित्येक पटीने असे सुचविणारा हा काळ आहे. त्यामुळे काळजीपूर्वक वागावे. भाग्यातील वक्री शनि तसेच अष्टमातील गुरु हा योग जीवनात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडविण्याची शक्मयता आहे.


वृषभ

धनस्थानी मंगळ राहू असल्याने कुणाशीही बोलताना कटुता येणार नाही, याची काळजी घ्या, तसेच अष्टमात वक्री शनि हा योग महत्त्वाच्या कामात जरा अडचणी निर्माण करणारा आहे, पण शिक्षण, आरोग्य, पैसा अडका, मानसन्मान, विवाह या बाबतीत अनुकूलता लाभेल. प्रेमप्रकरणात फसवणूक तसेच आर्थिक बाबतीत काही अंदाज चुकतील.


मिथुन

राहू, मंगळ युती तुमच्या राशीतच होत आहे. शिवाय सप्तमात वक्री शनि हा विचित्र योग आहे. काही बाबतीत निर्णय चुकण्याची  शक्मयता आहे. शनिच्या कारवायाही सुरू होतील. सर्व बाबतीत काळजी घ्यावी. केव्हा काय घडेल याचा अंदाज लागणार नाही. महत्त्वाच्या कामात अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. अति दूरवरचे प्रवास टाळावेत तसेच आर्थिक व्यवहार जपून करावेत.


कर्क

वक्री शनि सहाव्या स्थानी चांगला आहे. काही बाबतीत मोठे यश देईल, रवि लाभात आहे अपेक्षा नसताना मोठमोठे लाभ होतील. हा योग काहीवेळा राजयोगाचे बळ देत असतो. तुमच्या पत्रिकेत तसा योग असेल तर आगामी तीन महिने तुम्हाला अत्यंत लाभदायक व प्रत्येक कामात यश देणारे ठरतील.


सिंह

अत्यंत महत्त्वाच्या स्थानी राहू, मंगळ व दशमात रवि आहे. अचानक श्रीमंती व मानसन्मान तसेच राजकारणात यश देणारा काळ आहे. तुमच्या मूळ पत्रिकेतही तसे योग असणे आवश्यक आहे. वकी शनि,राहू, मंगळ पंचमस्थानी हा योग चांगला नाही. आर्थिक नुकसान होऊ शकते. मुलाबाळांना वाहन देताना दहावेळा विचार करा.


कन्या

शनि व मंगळ, राहू या दोन महत्त्वाच्या ग्रहांचे प्रतियोग काहीवेळा त्रासदायक ठरतात. जीवनाला कलाटणी देणारा हा काळ आहे. काही महत्त्वाचे बेत बदलावे लागतील. अपघात व धोका होण्याचे योग आहेत. कितीही नास्तिक असलात तरी या महिन्यात चुकूनही देवाधर्माची निंदानालस्ती करू नका अथवा अघोरी मार्गाकडे वळू नका.


तुळ

वक्री शनि तृतीय स्थानी हा योग, प्रवासाला चांगला नाही, येणे असलेली रक्कम अडकण्याची शक्मयता. त्यामुळे आर्थिक अडचणी जाणवतील. मंगळ, राहुचा योग सर्व तऱहेच्या धोक्मयापासून सावध राहण्यास सुचवित आहे. काही लोक तुमची सत्वपरीक्षा पाहतील. धनस्थानातील गुरु चांगला आहे. आर्थिक लाभ होतील. देवाधर्माचा अपमान होईल,असे चुकूनही वागू नका.


वृश्चिक

गुरु उत्तम व गजकेसरी योगात असल्याने सर्व संकटातून सुटका होईल. धनस्थानी वक्री शनि तुमच्या जीवनाचा रागरंग बदलतील. प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू होईल. गुरु सप्तमस्थानी आल्याने लग्नकार्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. वैवाहिक जीवनात काही खळबळ माजविण्याची शक्मयता आहे. पण वास्तू व वाहन वगैरे संदर्भातील महत्त्वाचे कामे करून घ्यावीत.


धनु

राशीतून वक्री शनि अशुभ योगात असल्याने शत्रुपीडा व आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. पण धनप्राप्तीच्या दृष्टीनं चांगले योग आहेत. अचानक लाभ संभवतात. मंगळ राहुचा शनिशी होणारा प्रतियोग वाहन दुर्घटना दाखवितो. काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायात काही तरी गेंधळ माजेल. राहू सातवा असल्याने अचानक मोठे लाभ होण्याचे योग.


मकर

मंगळ – राहु युती व बुध-शुक्र -हर्षलयुती महत्त्वाच्या ग्रहांचा जंक्शन महिना म्हणून या महिन्यातील घटनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शनि वक्री अवस्थेत असल्याने मुलाबाळांची काळजी यावी. गुरु लाभात असून तो काही बाबतीत शुभ आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कुणाच्या सांगण्यावरून जुन्या वस्तुंच्या व्यवहारात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.


कुंभ

वक्री शनिमुळे गैरसमज वाढतील. लग्नासंबंधी बोलणी केल्यास त्यात अडचणी येतील. गुरु दशमस्थानी असल्याने घरादारांसंबंधीच्या समस्या सुटतील. खर्च वाढणार आहेत पण ते योग्य कारणासाठी असतील. मंगळ, राहुच्या काळात बाधिक पीडेपासून जपावे लागेल. तसेच घरातील गंजलेल्या वस्तुंचा त्याग करा.


मीन

वक्री शनिमुळे आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. फाजिल खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुणी कितीही नाटके केली तरी उसनवार पैसे देऊ नका. नक्कीच बुडतील. हर्षल, रवि, मंगळ आगामी काही महिने तुमची सत्वपरीक्षा पाहील. कोठेही संशयाला वाव देऊ नका. काही प्रकरणे गंभीर रुप धारण करतील. सावधगिरीने वागणे चांगले,