|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » नऊ सत्राच्या घसरणीनंतर बाजार तेजीसह बंद

नऊ सत्राच्या घसरणीनंतर बाजार तेजीसह बंद 

सेन्सेक्स 227.71 अंकानी तेजीत, निफ्टी 11,222.05 वर बंद

वृत्तसंस्था/मुंबई

मागील नऊ सत्रात मुंबई शेअर बाजारात सलग घसरणीचा प्रवास नोंदवला. परंतु मंगळवारी मात्र याला पूर्ण विराम देत बीएसई सेन्सेक्स 227.71 अंकाची तेजी नोंदवत 37,318.53 वय बंद झाला. इंट्रा डेच्या दरम्यान 37,572.70 वर वधारत तय 36,956.10 वर खाली घसरण झाली. तर दुसऱया बाजूला निफ्टीने 73.85 अंकानी तेजी नोंदवत 11,222.05 स्थिरावल्याची नोंद करण्यात आली.

जूनमध्ये होणाऱया रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात संदर्भात होणाऱया बैठकीत कोणत्या गोष्टीचा निर्णय होणार आणि त्यांचा गुंतवणूक व अन्य क्षेत्रावर कोणत्या प्रकारे बदल होणार आहे. यांचा अंदाज सध्या शेअर बाजारात मांडण्यात येत आहे. दिवसभरातील व्यवहारात मंगळवारी सेन्सेक्समधील 30 मधील 16 आणि निफ्टीतील 50 मधील 34 शेअर्स फायद्यात राहिले असल्याचे नोंदवले आहे. एनएसईच्या 11 मधील 10 क्षेत्रांचा निर्देशाकांत मात्र तेजी राहिली आहे. पीएसयू बँक निर्देशाक 2.85 टक्क्यावर बंद झाला.

निर्देशाकात सुधारणा

रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि स्टेट बँक यांच्या निर्देशाकात काही प्रमाणात रिकव्हरी झाल्याचे पहावयास मिळाले. तर सन फार्माचे शेअर्स 5.87 टक्क्यांनी तेजीत राहिलेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, वेदान्ता, इंडसइंड बँक, स्टेट बँक आणि रिलायन्स इंटस्ट्रीज यांचे शेअर्स 5.40 टक्क्यांनी वधारलेत. तर दिग्गज कंपन्यांमध्ये टीसीएस, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो आणि इन्फोसिस यांचे शेअर्सची सर्वाधिक घसरण झाल्याची नोंद करयात आली.

महत्वांची क्षेत्र

दूरसंचार, वीज उत्पादन आणि भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स 2.81 टक्क्यांनी नफ्यात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.