|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आरटीई प्रवेशातील भ्रष्टाचार थांबवा अन्यथा आंदोलन

आरटीई प्रवेशातील भ्रष्टाचार थांबवा अन्यथा आंदोलन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांना 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक होते. पण शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये बहुतांश शाळंना नियमांचे उल्लंघन करून पालकांना वेठीस धरत आहेत. मोफत प्रवेश असताना थोडीफार प्रवेश शुल्क भरण्याची सक्ती करीत आहेत. हा गैरप्रकार थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाधिकाऱयांना युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला. अप्पर दंडाधिकारी शितल मुळे यांनी निवेदन स्विकारले.

निवेदनात म्हंटले आहे, शासनाने गरीबांच्या 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिले पाहिजेत, अशी सक्ती केली आहे. ही प्रक्रिया व्यवस्थित राबवली जाते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषद शिक्षण धिकाऱयांची नेमणूक करावी. पालक मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तक्रार करण्यास पुढे येत  नाहीत. सर्व पात्र शाळेत संबंधीत शिक्षणाधिकाऱयांचा मोबाईल नंबर व नाव लावावे. जिल्हाधिकाऱयांनी लक्ष न घातल्यास आंदोलन केले जाईल. यावेळी फिरोज सरगुर, सुशांत बोरगे, कुमार पोवार, करण पोवार, गौतम साळोखे, विजयकुमार खोराटे, पप्पु जाधव, स्वप्निल कदम आदी उपस्थित होते.