|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आमदार मुश्रीफांच्या फंडातून खडकेवाडा मेन रोडचे डांबरीकरण

आमदार मुश्रीफांच्या फंडातून खडकेवाडा मेन रोडचे डांबरीकरण 

वार्ताहर / नानीबाई चिखली

खडकेवाडा ता. कागल येथील गावातील मुख्य रस्त्यांची गेल्या पंधरा-वीस वर्षापासून दयनीय आवस्था झाली होती. रस्त्यावरती खडय़ांचे साम्राज्य पसरले होते. या रस्त्यासाठी गावकऱयांनी  वेळोवेळी आंदोलन केले होते. आमदार हसन मुश्रीफ यांनी याची दखल घेवून या रस्त्यासाठी आपल्या आमदार फंडातून 10 लाख रुपये मंजूर केले होते. या रस्त्याचे काम आता पूर्णत्वाकडे असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

 पावसाळ्यात या रस्त्याववरुन चिखल, खडय़ातून  ये-जा करावी लागत होती.  गेल्या अनेक वर्षापासून खडकेवाडय़ातील या रस्त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते.  या रस्त्यासाठी गावातील युवकांनीही अनेकवेळा आंदोलन केले होते. आमदार     मुश्रीफ एका कार्यक्रमानिमित्त गावात आले असता त्यांनी या रस्त्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या रस्त्यासाठी आमदार मुश्रीफ यांनी आपल्या फंडातून 10 लाख रुपये मंजुर केले होते. आता या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. याच रस्त्यातील कांही अंतर जि. प. च्या फंडातून याआधी झाले आहे. उर्वरीत 480 मीटर रस्त्याचे काम  या 10 लाख रुपये फंडातून करण्यात आले आहे. दरम्यान बेळुंकी येथील अंतर्गत रस्त्यासाठीही आमदार मुश्रीफ यांनी निधी मंजूर केला आहे.

या रस्तेकामासाठी मकबुल मकानदार, युवराज जाधव, रमेश कदम, अशोक कदम, संदीप खोत, भाऊसो पाटील, सुनील कदम, अनिल लोंढे, सरपंच सौ. संध्या विठ्ठल माळी, सुरेश पाटील, सौ. दीपा कुदळे, बी. एस. कांबळे, रामचंद्र कांबळे, संतोष कांबळे, सुनील कांबळे यांनी पाठपुरावा केला. शाखा अभियंता. एम. जी. पाटील, उपअभियंता कोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या रस्त्याचे काम संदीप सुतार व अझरुद्दीन सय्यद यांनी पेले आहे.

20 मीटर जादा काम

आमदार हसन मुश्रीफ यांच्या 10 लाख रुपये फंडातून 460 मीटर रस्त्यांचे काम करायचे होते. मात्र 460 मीटरच्या पुढे रस्त्यांमध्ये खड्डे असल्याने संदीप सुतार व अझरुद्दीन सय्यद यांनी या रस्त्याचे काम 20 मीटरने वाढवून एकूण 480 मीटर रस्ता केला. याबद्दल गावकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.