|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हिंसेचे थेट प्रसारण रोखणार फेसबुक

हिंसेचे थेट प्रसारण रोखणार फेसबुक 

सॅन फ्रान्सिस्को 

 हिंसेचे थेट प्रसारण आणि त्याचे शेअरिंग रोखण्याच्या उद्देशाने फेसबुकने ‘वन स्ट्राइक पॉलिसी’ तयार केली आहे. न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमधील हल्लेखोरांकडून हिंसेचे थेट प्रसारण करण्यात आल्यावर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.  नियमांचा भंग केलेल्या व्यक्तींवर फेसबुकच्या लाइव्ह स्ट्रीमिंग फीचरचा गैरवापर केल्याप्रकरणी बंदी घालण्यात येणार आहे. एखाद्या वापरकर्त्याने फेसबुकवर हिंसक चित्रफितींचे थेट प्रसारण केल्यास तो भविष्यात या फीचरचा वापर करू शकणार नसल्याची माहिती फेसबुकचे पदाधिकारी गाय रोसेन यांनी दिली. मार्च महिन्यात ख्राइस्टचर्च येथील दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रसारण करण्यात आले होते.