|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » इंडिगोकडून ‘समर सेल’ योजनेची घोषणा

इंडिगोकडून ‘समर सेल’ योजनेची घोषणा 

मे-सप्टेंबर या काळातील प्रवासाकरीता सवलत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आपली हवाई सेवा देताना वेगळेपण जपणारी एअरलाईन्स इंडिगो आता प्रवाशांसाठी ‘समर सेल’ या नावानी स्वस्त तिकिट विक्रीची योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये  53 देशातील हवाईमार्ग आणि 17 आंतरराष्ट्रीय मार्गावर ही सेवा दिली जाणार आहे. या  योजनेचे बुकिंग मंगळवारपासून सुरु करण्यात येणार असून सदरचा प्रवास 29 मे ते 28 सप्टेंबर या कालावधीत करता येणार आहे. यांच्यात 999 रुपयापासून स्वस्त तिकिट दर सुरु राहणार  आहे.

प्रवासाचे मार्ग दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-दुबई, चेन्नई-कुवेत, दिल्ली-क्वालालंपूर आणि बेंगळूर-माले  आदी मार्गाचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर उन्हाळी सुट्टी असल्याने आम्ही तीन दिवसांची सवलत योजना तिकिट विक्री सुरु करणार असल्याची माहिती इंडिगोचे मुख्य वाणिज्य अधिकारी विलियम बाउल्टर यांनी दिली आहे. 

सदर योजना सुरु केली असून यात अन्य विमान कंपन्यांसोबत तुलना केल्यास देशातील कंपन्यामध्ये इंडिगोची हिस्सेदारी 44 टक्के असल्याचे स्पष्टीकरण नागरी उड्डाण खात्याकडून देण्यात आले आहे.