|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » साखर उत्पादनावर घसरणीचे सावट

साखर उत्पादनावर घसरणीचे सावट 

सलग दुसऱया वर्षांतही घसरणीसह 8.4 टक्क्यांवर स्थिरावणार?  यूएसडीआयची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उसाचे उत्पादन ही निश्चित आकडेवारीपेक्षा ऑक्टोबर-सप्टेंबर 2019-20 या साखर व्यापारी वर्षात घटण्याचे संकेत मांडण्यात आले आहेत. या कारणांमुळे भारतातील साखर उत्पादन 8.4 टक्क्यांनी घटत 3.03 कोटी टन राहण्याचे संकेत अमेरिका कृषी विभाग (यूएसडीएस) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आहवालात म्हटले आहे.

सदरची साखर उत्पादनांतील घट ही दुसऱया वर्षात कायम राहिल्याचे नोंदवले आहे. व्यापारी वर्ष 2018-19 मध्ये साखर उत्पादन 3.3 कोटी टन राहण्याचे अनुमान आहे. यात मागील वर्षात झालेले उत्पादन 3.43 कोटी टनाची नोंद आहे. व्यापार वर्ष 2019-20 मध्ये साखरेचे उत्पादन 8.4 टक्क्यांनी घटत जात 3.03 कोटी होण्याचे यूएसडीएसच्या अहवालात अनुमान मांडले आहे. हा दर कायम राहिल्यास ही घट दुसऱया वर्षातील कायम राहिल्याचे स्पष्ट होणार असल्याचे म्हटले आहे.

दराचा परिणाम उत्पादनावर

राष्ट्रीय-सरासरी साखरेच्या दरातील होणारी रिकव्हरीत निव्वळ मिळणारी किमंत कमी असून त्यापाठोपाठ होणारे साखरेचे उत्पादन तेही घटत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. यांचा फटका साखर उत्पादनावर बसत असल्याचे स्पष्टीकरण यूएसडीएच्या माहितीतून देण्यात आले आहे. तर इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी उसाचे उत्पादन होणे आवश्यक आहे आणि त्यातून जादाचा नफा मिळण्याचा मार्ग उपलब्ध होत असल्याचे यावेळी म्हटले आहे.

साखर उत्पादनील महत्वाची राज्य

मागील चार वर्षात तिसऱयांदा उतर प्रदेश भारतातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेणारा देश आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्याचा समावेश होतो. तर सरासरी एकूण उसाचे उत्पादन हे 47 लाख हेक्टरमध्ये असून त्याचे 35.5 केटी टन उत्पादन राहण्याचे संकेत आहेत.ाखा