|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » ऍल्युमिनिअमच्या किंमतीत घसरण

ऍल्युमिनिअमच्या किंमतीत घसरण 

नवी दिल्ली

 बाजारात होणाऱया व्यवहारा दरम्यान सुरु असणाऱया मंदीच्या वातावरणामुळे नियमित होणाऱया सौदेबाजीवेळी आकारण्यात येणाऱया किमंतीला फटका बसल्याने बुधवारी ऍल्युमिनिअमच्या किंमतीत 0.3 टक्क्यांनी घसरण होत 149.75 रुपये प्रति किलोग्रॅमवर राहिली आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांची मागणीत होणारी घटीने किमंत घसरण्यास सुरुवात झाली आहे. एमसीएक्समधील ऍल्युमिनिअमने मे महिन्यात पुरवठा करतानाची किमंत 45 पैसे किंवा 0.3 टक्क्यांनी नुकसानीसोबत 149.75 रुपये प्रतिकिलोग्रॅम राहिली आहे. यात 1,575 च्या साठवूण ठेवलेल्या ऍल्युमिनिअमचा व्यवहार करण्यात आला.