|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » सॅमसंग ए आवृत्ती स्मार्टफोन्सची विक्री सर्वोच्च विक्रम

सॅमसंग ए आवृत्ती स्मार्टफोन्सची विक्री सर्वोच्च विक्रम 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सॅमसंगने 1 मार्च 2019 रोजी आपल्या ए आवृत्तीचे स्मार्टफोन्स सादर केले होते. सदर फोन्सची मागील 70 दिवसांमध्ये 50 लाख युनिट्सची विक्री सॅमसंगने केली आहे. या विक्रीतून कंपनीने जवळपास 1 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. या विक्री आणि नफ्याचा विचार करता हा कंपनीकडून आगामी काळासाठी विक्रमाची नोंद होण्याचा अंदाज कंपनीतील एका अधिकाऱयानी  मांडला आहे.

नियोजित वेळेनुसार विक्रीचा टप्पा 2019 मध्ये पार करणे सोपे होणार आहे. कारण ऑनलाईनच नव्हे तर ऑफलाईनही विक्री सुरु करण्यात आली आहे. यांचा फायदा व्यवसाय वाढीसाठी होणार असल्याची सॅमसंग इंडियाचे चीफ मार्केटिंग अधिकारी रंजीव सिंह यांनी दिली आहे.

सॅमसंग स्मार्टफोन सेगमेंटमधील चिनी शाओमीने सॅमसंगची हिस्सेदारी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. अशी माहिती आयडीसीच्या माहितीतून समोर आली आहे. यात जानेवारी मार्च या कालावधीत शाओमी 30.6 टक्के मार्केट शेअरसह टॉपवर राहिली. तर सॅमसंगचा मार्केट शेअर 4.8 टक्क्यांनी घसरत जात 22.3 टक्क्यावर राहिला आहे. तसेच कंपनीने जीकेएफ माहितीचा दाखला देत मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे 42 टक्के शेअर राहिल्याची नोंद केली आली.

सॅमसंगच्या एम आवृत्तीच्या स्मार्टफोन्सची विक्रीही समाधानकारक झालेली आहे. यात सर्वात महत्वाचा रोल म्हणजे ऑनलाईन झालेली विक्री होय. शाओमीच्या तुलनेत सॅमसंगचा ऑनलाईन शेअर 13.5 राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.