|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्सची पुन्हा 204 अंकानी घसरण

सेन्सेक्सची पुन्हा 204 अंकानी घसरण 

वृत्तसंस्था/ मुंबई

मागील नऊ सत्रांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार मंगळवारी काहीसा सावरला होता. परंतु बुधवारी पुन्हा तो घसरण होत बंद झाला आहे. दिवसभरातील व्यवहारात चढउताराचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यात बीएसई सेन्सेक्स 203.65 अंकानी कमजोर होत 37,114.88 वर बंद झाला. व्यवहारा दरम्यान तो 37,559.67 पर्यंत वधारल्याची नोंद करण्यात आली. या उलट राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65.05 अंकानी घसरत जात 11,157 वर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार युद्ध व लोकसभा निवडणुकीच्या असणाऱया दबावातील वातावरणाचा प्रभाव मुंबई शेअर बाजारावर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. बुधवारी येस बँक आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स सर्वाधिक म्हणजे 8 टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. धातू निर्मिती, दूरसंचार, वीज निर्मिती, ऑटो आणि बँकिंग या क्षेत्रांतील व्यवहार 2.08 टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याचे नोंदवले आहे.

तर अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, कोल इंडिया, सन फार्मा, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी , लार्सन ऍण्ड टुब्रो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स 3.66 टक्क्यांनी घसरणीत राहिल्याची नोंद करण्यात आली. दुसऱया बाजूला बजाज फायनान्स सर्वाधिक म्हणजे 4.11 टक्क्यांनी तेजीत राहिलेत यासोबत आयटीसी, कोटक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएस यांचे शेअर्स 1.05 टक्क्यांनी वधारल्याची नेंद करण्यात आली.

दोन महासत्तामधील व्यापार युद्धाचा चर्चेचा देशासह अन्य शेअर बाजारावार दबाव राहिल्याचे पाहावयास मिळत आहे. यात उत्पादनांवरील आयात शुल्क आकारणे व बंदी घालण्याच्या चर्चेचा परिणाम नाकारात्मक राहिल्याचे दिसून येत अहे.