|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज रोडवर स्पीडब्रेकरवर रबर पेंटची मागणी

मिरज रोडवर स्पीडब्रेकरवर रबर पेंटची मागणी 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली मिरज रोडवरील स्पीडब्रेकरवर रबर पेंट व संबधित ठिकाणी स्पीडब्रेकर असल्याचे फलक लावण्यात यावेत. अशी मागणी मदन पाटील युवा मंचच्यावतीने बुधवारी करण्यात आली.

सांगली मिरज हा शहरातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग आहे. या रोडवर महापलिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात आली आहेत. दहा कि.मी. रस्त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त स्पीडब्रेकर बसविण्यात आली आहेत. ही स्पीडब्रेकर अनेक ठिकाणी असल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना दिसत नाहीत. त्यावर पांढरे पट्टे वा रबरी पेंट नसल्याने वाहनचालकांना स्पीडब्रेकरचा अंदाज येत नाही. त्यामुळे या स्पीडब्रेकरमुळे वाहनांना ब्रेक लागल्याऐवजी दुचाकींचे छोटे मोठे अपघातच जास्त प्रमाणात होऊ लागले आहेत. अशा अपघातातून  अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.

 सांगली मिरज रोडवर कर्मवीर चौक, मार्केट यार्ड, वसंत बंगला, पोलीस मुख्यालय परिसर, विश्रामबाग चौक, विलिंग्डन, वालचंद महाविद्यालय, विजयनगर, वॉन्लेसवाडी, मिशन हॉस्पिटल चौक आदी काही चौकामध्ये ही स्पीडब्रेकर बसविण्यात आली आहेत. या स्पीडब्रेकरवर रबरी पेंट तसेच संबधित स्पीडब्रेकरच्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत. अशी मागणी युवा मंचतर्फे करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, शितल लोंढे, नगरसेवक प्रकाश मुळके, अमोल झांबरे, प्रविण निकम, अमित लाळगे, संतोष खरात, महेश कर्णे, जीवन बाबर, अवधूत गवळी, नसीर शेख, सुजीत लकडे, प्रमोद उपाध्ये, प्रविण आलदर आदी उपस्थित होते.