|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हैसाळ धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

म्हैसाळ धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

प्रतिनिधी / फोंडा

पंचवाडी येथील म्हैसाळ धरणाच्या पात्रात बुडून कुडचडे येथील 15 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भागवतसिंग गंगासिंग दहिया असे त्याचे नाव असून तो कुडचडे येथील गार्डीयन एन्जल हायस्कूलचा विद्यार्थी होता. काल बुधवारी सायं. 4 वा. सुमारास ही घटना घडली.

भागवतसिंग हा टय़ुशनला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. मात्र तो टय़ुशनला न जाता अन्य दोघा विद्यार्थी मित्रांसोबत म्हैसाळ धरणावर पोचला. पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता तो बुडला. त्याच्या इतर दोघा मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर काही स्थानिक लोक घटनास्थळी धावले. स्थानिकांनी पाण्यात उतरुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर कुडचडे अग्निशामक पथकाला बोलावण्यात आले. पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतल्यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह कॅमेरात दिसून आला. स्थानिकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. फोंडा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविला आहे. भागवतसिंग हा कुडचडे येथील गार्डीयन एन्जल हायस्कूलमध्ये शिकत होता. यंदा त्याने दहावीची परीक्षाही दिली होती. दहिया कुटुंब हे मूळ राजस्थान येथील असून त्याच्या वडिलांचा कुडचडे येथे व्यावसाय आहे. त्याच्यापश्चात आई वडिल व एक छोटा भाऊ व बहिण असा परिवार आहे. वडिल कामानिमित्त गावात गेले असून त्याची आईही बुधवारी रात्री गावात जायला निघाली होती.