|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी पोटनिवडणुकीत चारित्र्यवान उमेदवारालाच निवडून द्या

पणजी पोटनिवडणुकीत चारित्र्यवान उमेदवारालाच निवडून द्या 

प्रतिनिधी/ पणजी

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पणजी मतदारसंघातील मतदारांना चारित्र्यवान उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. पणजी पोटनिवडणुकीतील चारित्र्यवाहन उमेदवार हे प्रा. सुभाष वेलिंगकर आहे. याचाच अर्थ त्यांनी प्रा. वेलिंगकर यांना मत मारण्याचे आवाहन केले आहे. विनय तेंडुलकर हे पहिल्यांदाच खरे बोलले असल्याने त्यांच्या या विधानाचे गोसुमंचे ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नाईक यांनी स्वागत केले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत युवा अध्यक्ष ऍड. हृदयनाथ शिरोडकर, प्रचार प्रमुख महेश म्हांबरे, अध्यक्ष आत्माराम गांवकर, कार्यकर्ता शैलेंद्र वेलिंगकर, सुनील सिग्नापुरकर यांची उपस्थिती होती. भाजपचे माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांनीही मान्य केले की प्रा. वेलिंगकर यांचाही भाजप सत्तेवर येण्यामागे सहभाग आहे. खाणीचा प्रश्न 15 दिवसात सोडवणार असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. निवडणुक आल्यावर खाण प्रश्न सोडवणार असे प्रत्येकवेळी भाजप नेते सांगातात. आता किमान त्यांच्याही हा खोटारडेपणा थांबवावा असे आवाहन किरण नाईक यांनी केले.

हृदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रा. वेलिंगकर यांना काँग्रेसने ठेवले आहे असा प्रचार करण्यास सांगितले. प्रा. वेलिंगकर यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उठवणाऱया डॉ. सावंत यांनी स्वतःकडे पाहावे. मुख्यमंत्री सावंत यांचीच राजकीय क्षेत्रात प्रॉपर्टी सावंत म्हणून ओळख आहे. अशा माणसाने एका चारित्र्यवान उमेदवारावर बोलणे म्हणजेच त्याची मानसिकता कुठल्या पातळीवर गेलेली आहे हे लक्षात येते.

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ मांडवीत नवीन इमारत उबारत आहे. याचे कंत्राट कुणी घेतले याची माहिती देणारा बोर्ड बाहेर लावावा लागतो हे बहुतेक मुख्यमंत्र्यांना माहीत नसावे. मुख्यमंत्र्यांनी वर्तमानपत्रात जाहीररीत्या छापून आणवे की यात पॅसिनोंची कार्यालये असणार नाही. भाजपचे नेते म्हणतात की पॅसिनो काँग्रेसने आणले. असे असेल तर भाजपने प्रत्येक पॅसिनो मांडवीत कधी आला हे तारखेसहीत वर्तमानपत्रात छापावे असे आव्हान ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी केले.

शैलेंद्र वेलिंगकर यांनी स्पष्ट केले की आपण बाबुशसोबत नाही. हे विधान मुख्यमंत्र्यांने करणेच हास्यास्पद आहे. खरेतर यावर स्पष्टीकरण देण्याची लायकी सदर विधानाची नाही. या राहीलेल्या दिवसात अशाप्रकारची अफ्ढवा उठवण्यात येईल. आम्ही सर्व प्रा. वेलिंगकर यांच्यासोबात आहोत. भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गोसुमंला जोरदार व शिस्तबद्ध प्रचार चालू असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related posts: