|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलिसावर हल्ला करणाऱया त्रिकुटाला अटक

पोलिसावर हल्ला करणाऱया त्रिकुटाला अटक 

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या दहा दिवसांपूर्वी बाळेकुंद्री खुर्द येथील उरुस कार्यक्रमात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसावर खुरप्याने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून बुधवारी त्यांना पोलीस कोठडीत घेण्यात आले होते.

गौस जयनुल कुडची (वय 26), बाबु महम्मद कुडची (वय 26), मुस्ताक अस्कर कुडची (वय 23, तिघेही रा. बाळेकुंद्री खुर्द) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी 11 मे रोजी किशनलाल लालमोहर सहनी (वय 42 मूळचा रा. मैरिटार, जि. बलिया उत्तर प्रदेश, सध्या रा. सांबरा) याला अटक करण्यात आली होती.

या सर्व चौघा जणांवर भा.दं.वि. 307, 353, 504, 506 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आले होते. मारिहाळ पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. राजू कुरबर (वय 29) या पोलीसावर खुरप्याने हल्ला करण्यात आला होता.