|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू 

वार्ताहर/ कोगनोळी

नव्याने बांधकाम करण्यात येत असलेल्या घराला पाणी मारताना विद्युत मोटारीची पीन काढतेवेळी विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास मत्तीवडे (ता. निपाणी) येथे घडली. उमेश शिवाजी बेनाडे (वय 23 रा. मत्तीवडे) असे मृत युवकाचे नाव आहे.

उमेश हा येथील बसस्थानकानजीक बांधण्यात येणाऱया घराला पाणी मारत होता. याचवेळी विद्युत मोटारीची पीन काढताना त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. यानंतर तत्काळ त्याला कागल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्याठिकाणी त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच उमेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उमेश याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. उमेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.