|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बुधवारीही हलगा-मच्छे बायपासचे काम युद्धपातळीवर

बुधवारीही हलगा-मच्छे बायपासचे काम युद्धपातळीवर 

प्रतिनिधी/ बेळगाव

हलगा-मच्छे बायपास काम बुधवारीही सुरूच होते. मच्छेपासून काम केल्यानंतर आता अलारवाडकडून काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. वडगाव, शहापूर शिवारात सर्व्हे करून कामाला गती देण्यात येत आहे. लवकरात लवकर काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱयांनी विरोध करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पोलीस व प्रशासनासमोर शेतकऱयांचे काहीच चालत नाही. गेली 10 वर्षे या रस्त्याच्या विरोधात लढा देण्यात आला होता. मात्र, आता पोलिसांच्या दडपशाहीसमोर शेतकरी हतबल झाले आहेत. मच्छेपासून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्या ठिकाणचे आता सपाटीकरण सुरू आहे. याचबरोबर अलारवाडकडूनही जोरदार काम सुरू असल्यामुळे येत्या काही दिवसातच रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.

सुपीक जमीन गेल्यामुळे शेतकरी मात्र तणावाखाली वावरताना दिसू लागले आहेत. आता विरोध करूनही काहीच उपयोग होणार नाही हे शेतकऱयांना  समजले आहे. आता न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकूणच हलगा-मच्छे बायपास दडपशाही करून पूर्ण करण्याकडे जिल्हा प्रशासनाची आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.