|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे जोतिबास साकडे

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे जोतिबास साकडे 

जोतिबा डोंगर / वार्ताहर :

 कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दख्ख्नचा राजा श्री जोतिबाच्या चरणी साकडे घातले. महाराष्ट्र राज्यातला दुष्काळ जाउंदे, या वर्षी भरपूर पाउस पडूदे, गुराढोरांना भरपूर चारा मिळूदे, चारा टंचाईचे निवारण होउदे, महाराष्ट्रातला कष्टकरी शेतकरी समृध्द होउदे, दीन दलितांना, गरीब जनतेला सुबत्ता येउदे अशा शब्दात त्यांनी जोतिबाच्या चरणी लीन होउन साकडे घातले.

 आवाडे म्हणाले, देशातले संवेदना नसलेले सरकार जाऊन कष्टकरी शकतकऱयांचे प्रश्न सोडवणारे, लोकशाही मजबूत करणारे पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार येऊदे, अशीही आपली भावना जोतिबाच्या चरणी व्यक्त केली. त्याचबरोबर श्री जोतिबा हे जागृत देवस्थान असल्याने माझ्या भावना मनापासून देवासमोर मांडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

  प्रकाश आवाडे यांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्रयातील कॉंग्रेसचे जवळपास 200 कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जोतिबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात उत्साहात कार्यकर्त्यांनी जोतिबा डोंगरावर प्रवेश केला. व जोतिबाच्या चरणी लीन होऊन आपले साकडे घातले.

यावेळी प्रकाश आवाडे यांनी जोतिबा देवाची पूजा-अर्चा  व धार्मिक विधी केले. तसेच त्याचे पुजारी आनंदा लादे यांनी कार्यकर्त्यांना पुरण पोळीचा प्रसाद देण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रवि मोरे, बाळासाहेब माने, जोतिबा व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष आनंदा लादे, पन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सौ. लक्ष्मी नारायण लादे, विष्णुपंत दादर्णे, गावातील ग्रामस्थ कायकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.