|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हरिष स्वामीच्या मोटारीची फॉरेन्सिक तपासणी

हरिष स्वामीच्या मोटारीची फॉरेन्सिक तपासणी 

प्रतिनिधी  /कोल्हापूर :

    कर्जाच्या वसुलीसाठी नवविवाहीतेवर बलात्कार करणाऱया खासगी सावकार हरीष स्वामी याच्या मोटारीची पोलीसांनी फॉरेन्सिक तपासणी केली. यामध्ये मोटारीच्या सर्वसीट्ससह, कानाकोपऱयाची कसून तपासणी फॉरेन्सिक टिमने केली. दरम्यान मंगळवारी सकाळी हरिष स्वामी याला त्याच्या रूईकर कॉलनी येथील घर, गोकुळ शिरगांव येथील कार्यालयात, तपोवन मैदान या ठिकाणी घटनास्थळावरून फिरविले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला गुरूवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

    खासगी सावकार हरिष स्वामी या एका अभियंता असलेल्या तरूणाला व्याजाने 30 हजार रुपये दिले होते. वेळेवर व्याज देवूनही तो पैशांसाठी तगादा लावत होता. या पैशांच्यावसुलीसाठी त्याने अभियंत्याच्या पत्नीवर बलात्कार करून अत्याचार केले होते. पिडीत महिलेस सिगारेटचे चटके देवून तिचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.  सद्दाम सत्तार मुल्ला (वय 19, रा. यादवनगर), पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आशिष शिवाजी पाटील (वय 28, रा. अंबाई डिफेल्स कॉलनी, सायबर चौक) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.  हरिष विजयकुमार स्वामी (वय 22, रा. दत्तमंदिर शेजारी, रूईकर कॉलनी) याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान हरिष स्वामी याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर सोमवारी शाहूपुरी पोलिसांनी स्वामीला अटक केली होती.

   फॉरेन्सिक टीमकडून मोटारीची तपासणी

   हरिष स्वामी याने पिडीत महिलेस अलिशान मोटीरीतून तपोवन मैदानावर नेवून तिच्यावर अत्याचार करून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी हरिष स्वामी याची मोटार जप्त केली होती. या मोटारीची फॉरेन्सिक टीमच्या तज्ञांकडून तपासणी करून घेण्यात आली. फॉरेन्सिकच्या 5 जणांच्या पथकाने मोटारीची कसून तपासणी केली. यामध्ये काही महत्वाचे पुरावे मिळाले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.