|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘स्वरसंध्या’ मैफल स्वरात रंगली

‘स्वरसंध्या’ मैफल स्वरात रंगली 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

आकाशवाणी कोल्हापूर आणि गुणीदास फौंउडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आकाशवाणीच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सुगम संगीताची स्वरसंध्या मैफल स्वरात न्हाली. संगितसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये मंगळवारी ही मैफल पार पडली.

  आकाशवाणी केंद्र प्रमुख तनुजा कानडे, सतिश पडळकर गुणिदास फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे, उपाध्यक्ष दिलीप बनछोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भाग्यश्री मुळे, स्वरूपा बर्वे, अभिजित चव्हाण आणि प्रल्हाद जाधव यांच्या गायनाने मैफलीस रंगत आनली. मैफलीत नमन नटवरा, सावळा नंदाचा, घननिळा लडिवाळा, जेंव्हा तुझ्या बटांना, तुला पाहिले, हे सुरांनो चंद्र, गोविंद गोविंद, ये पुन्हा रंग, सूर तेची छेडिता, मी राधिका, केंव्हातरी पहाटे, विष्णूमय जग, माझिया प्रियाला, रुतुराज आज, धुंदी कळ्यांना आदी गीतांचे सादरीकरण केले. तर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. यास साथसंगत राजप्रसाद धर्माधिकारी (तबला), सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (व्हायोलिन), विक्रम पाटील (की बोर्ड), स्वप्निल सोळोखे (साइड रिदम) हरिप्रिया पाटील (हार्मोनियम), प्रिया दुंडगे ( निवेदिका) यांनी दिली. यावेळी अरविंद लाटकर, डॉ. अजित शुक्ल, दर्शन शिपूरकर आदी उपस्थित होते.