|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » एनएसईने 250 कंपन्यांवर आकारला दंड

एनएसईने 250 कंपन्यांवर आकारला दंड 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई)ने लिस्टींगमधील नियमावलीचे पालन करणाऱया जवळपास 250 कंपन्यांवर दंड आकारणी केली आहे. यामध्ये आयएल ऍण्ड एफएस गुपच्या दोन कंपन्या आणि जेट एअरवेजचाही समावेश असल्याची माहिती एनएसईकडून देण्यात आली आहे. 

कंपन्यांवर मार्च तिमाहीमधील नियम पुर्ण न केल्याच्या कारणामुळे 1000 रुपयापासून जास्तित जास्त 4.5 लाख रुपयापर्यंतची दंड आकारणी केली आहे. एकूण आकारण्यात येणाऱया दंडाची रक्कम विचारात घेता 8.84 कोटी रुपये इतकी आहे. सेबीकडून देण्यात आलेल्या आदी सूचनेच्या आधारे सदरची कारवाई संबंधीत कंपन्यांवर करण्यात आली आहे. शेअर बाजारात प्रत्येक घडामोडीची माहिती कंपन्यांनी सादर करावयाची असते. तसे न केल्यास शेअर बाजार संबंधीत कंपनीवर कारवाईचा बडगा उगारु शकतो.