|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » मागील दोन वर्षांत एटीएममध्ये घट, एटीएम व्यवहारात 21 टक्क्यांनी वाढ

मागील दोन वर्षांत एटीएममध्ये घट, एटीएम व्यवहारात 21 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल व्यवहार करण्यासाठी चालना दिली आहे. परंतु लोकांमध्ये वापरण्यात येणाऱया कागदी चलनाचा वापर काही कमी झाला नसल्याचे पहावयास मिळत आहे. तर दुसरी बाब म्हणजे एटीएमच्या आधारे करण्यात येणाऱया व्यवहारात तेजी राहिली आहे. आणि एटीएमची संख्या मात्र त्याप्रमाणात न वाढता घटत गेल्याचे मागील दोन वर्षांत पहावयास मिळाले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)च्या आकडेवारीत मांडण्यात आली आहे.

उपलब्ध आकडेवारी लक्षात घेतल्यास 2017 मध्ये देशात 208,354 एटीएम होते. तर मार्च 2019 पर्यंत हा आकडा 3 टक्क्यांनी घटत जात 202,196 वर स्थिरावल्याचे नोंदवण्यात आले आहे. हा बदल होण्याचे कारण म्हणजे एटीएमसाठी  लागू करण्यात आलेले कठिण नियमाचा परिणाम असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) च्या आधारे देण्यात आलेल्या माहितीनुसार ब्रिक्स देशातील प्रति एक लाख लोकच्यामागे भारतात अगोदरपासून एक एटीएम कमी आहे. आरबीआयने एटीएम सुरक्षा आणि अन्य नियमावलीत केलेल्या बदलांमुळे ऑपरेटर्सना अधिकचा खर्च उचलावा लागत असल्याचे म्हटले आहे. एटीएम उद्योग क्षेत्राने 2018 मध्ये म्हटले होते की, 2019 च्या सुरुवातीला 1.13 लाख एटीएम बंद होण्याची शक्यता आहे.