|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » वॉरन बफेच्या कंपनीकडे ऍमेझॉनचे 4 लाखाहून अधिक शेअर्स

वॉरन बफेच्या कंपनीकडे ऍमेझॉनचे 4 लाखाहून अधिक शेअर्स 

वृत्तसंस्था /ओमाहा(यूएस) :

जगभरात गुंतवणूक कशी करावी आणि त्यातून अधिकची नफा कमाई कमी वेळेत कशी करावी यासाठी वॉरन            बफे जगप्रसिद्ध आहेत. सध्या बर्कशायर हॅथवे या वॉरन बफेच्या कंपनीकडे ऍमेझॉन कंपनीचे जवळपास 4 लाख 83 हजार 300 शेअर्स आहेत. हा आकडा 31 मार्च या कालावधी पर्यंतचा असल्याची माहिती सिक्युरिइाr ऍण्ड एक्सचेंज कमीशन यांना दिली आहे. बुधवारी बाजार बंद होतानाच्या वेळी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार बर्कशायरकडे ऍमेझॉनचे 90.4 कोटी डॉलर (6328 कोटी रुपय) मूल्य असणारे शेअर्स असल्याची माहिती दिली आहे.

चालू महिन्यातील दोन तारखेला ऍमेझॉनमध्ये करण्यात येणाऱया गुंतवणुकीचा खुलासा बफे यांनी केला होता. परंतु त्यांनी आपल्याकडे असणाऱया शेअर्सच्या आकडय़ाचा खुलासा केला नव्हता. ऍमेझॉनमध्ये बफे यांनी प्रथमच गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. इतके असले तरी मोठय़ा शेअर धारकामध्ये बफेच्या कंपनीचा समावेश नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

बफेची नेटवर्थ 5.87 लाख कोटीवर

वॉरन बफे हे जगभरात गुंतवणूक करुन अधिकचा नफा कमाई करण्यात मशहुर असल्याचे मानले जाते. ऍपलसह अन्य महत्वांच्या कंपन्यांमध्ये बफेची गुंतवणूक आहे. तर बफे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत ग्रहस्थ म्हणून ओळखले जाताहेत. त्यांची नेटवर्थ 83.8 अब्ज डॉलर्स (5.87 लाख कोटी रुपये)  आहे. तर ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांची नेटवर्थ 117 अब्ज डॉलर(8.19 लाख कोटी रुपये) इतकी आहे.