|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » ‘क्वीक हील’तर्फे नेक्सट जनरेशन संच सादर

‘क्वीक हील’तर्फे नेक्सट जनरेशन संच सादर 

प्रतिनिधी /पुणे :

 ग्राहक, उद्योग आणि सरकार यांच्यासाठी आयटी सुरक्षितता उपाययोजना पुरविणारी आघाडीची कंपनी क्वीक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने गुरूवारी लॅपटॉप आणि डेस्कटॉपकरिता सायबरसुरक्षा उपाययोजनांशी संबंधित ‘लाइटर, स्मार्टर, फास्टर’ हा नवा अत्याधुनिक उत्पादन संच बाजारात आणत असल्याची घोषणा केली.

 सन 2018 मध्ये डेस्कटॉप आणि लॅपटॉप्सवर 97 कोटी 30 लाख मालवेअर धोके क्वीक हीलने आपल्या वार्षिक धोका अहवालात नमूद केले आहे. क्वीक हीलच्या नव्या अत्याधुनिक उत्पादनसंचाद्वारे ग्राहकांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती, बँकेची माहिती, खासगीपणा, आठवणी आदी गोष्टी सायबरधोक्मयांपासून सुरक्षित राहतील. नव्या उत्पादनसंचात टोटल रॅन्समवेअर प्रोटेक्शन, वेबकॅम प्रोटेक्शन, पोर्टेबल फाइल वॉल्ट, सेफ बँकिंग, पेरेंटल कंट्रोल, वेब सिक्मयुरिटी आदी अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात टोटल रॅन्समवेअर प्रोटेक्शनचा समावेश असून, इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच हे वैशिष्ट्य रॅन्समवेअर हल्ल्यांपासून वापरकर्त्याच्या  महत्त्वाची माहितीला पूर्ण सुरक्षा पुरवते. लोकप्रिय डॉक्मयुमेंट फॉरमॅटसह टॅली फाइल्सचे हल्ल्यांपासून संरक्षण होऊन त्याचे पुनरुज्जीवनही व्हावे, यासाठी क्वकि हीलने टोटल रॅन्समवेअर प्रोटेक्शनमध्ये टॅली बॅकअप हे वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे. पोर्टेबल फाइल वॉल्ट हे माहिती नष्ट होण्यापासून वाचवते. वेबकॅम प्रोटेक्शन हे वेबकॅमच्या खासगीपणावर होणारे हल्ले रोखते, अशी माहिती क्वीक हीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर व व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास काटकर यांनी दिली. 

  फोटो : पुणे : क्वीक हीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास काटकर व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर यांनी गुरूवारी लॅपटॉप आणि डेस्कटॉपकरिता सायबरसुरक्षा उपाययोजनांशी संबंधित ‘लाइटर, स्मार्टर, फास्टर’ हा नवा अत्याधुनिक उत्पादन संच बाजारात आणत असल्याची घोषणा केली.