|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » उद्योग » ग्राहकांच्या भेटीला आता ओलाचे पेडिट कार्ड

ग्राहकांच्या भेटीला आता ओलाचे पेडिट कार्ड 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

आपल्या ऍपच्या सुविधाचा वापर करुन टॅक्सी सेवा देणाऱया ओला कंपनीने आता आपल्या ग्राहकांच्यासाठी नवीन क्रेडिट कार्डची सुविधा सादर केली आहे. ही सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सोबत भागीदारी करुन लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

ओला पेडिट कार्डला ‘ओला मनी एसबीआय क्रेडिट कार्ड’ या नावानी सदरचे क्रेडिट कार्ड सादर करण्यात आले आहे.  सदरचे कार्ड हे सर्व ठिकाणी वापरता येण्याची सोय होणार आहे, व्हीसा कार्ड ज्या ठिकाणी वापरले जाणार आहे त्या ठिकाणी हे कार्ड वापरता येणार आहे. नवीन कार्ड असल्याने ग्राहकांना आकर्षक सवलतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

सवलत योजना सुरु करुन कंपनी ओला क्रेडिटच्या आधारे हॉटेल बुकिंग करणाऱया ग्राहकांसाठी 20 टक्क्यांची कॅशबॅक सुविधा देणार आहे. विमान तिकिट बुकिंग केल्यास 5 टक्क्यापर्यंत सवलत योजना सुरु करणार असल्याचे स्पष्टीकरण  दिले आहे. तरी आगामी काळात म्हणजे 2020 पर्यंत जवळपास 1 कोटी क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती ओल्याच्या अधिकाऱयांकडून देण्यात आली आहे.