|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भीमा नदीत 3400 क्सुसेक्सचा विसर्ग

भीमा नदीत 3400 क्सुसेक्सचा विसर्ग 

बेंबळे / वार्ताहर :

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापुर शहरासाठी आज सकाळी 6 वाजता 1700 क्युसेक ने  भिमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यात आज सकाळी 10 वाजता 4 गाळ मोऱयांमधून 1700 ने वाढ करत तो 3400 क्युसेक  करण्यात आले. तर सायंकाळ पर्यंत ते 7000 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

सोलापुर शहराला पाणीपुरवठा करणाऱया औज बंधारा कोरडा पडत आल्यामुळे त्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीकाठी व सोलापुरच्या औज बंधाऱयात पाणी संपत आल्याने सोलापुरकरांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाल्याने उजनीतुन तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय उजनी प्रशासनाला घेणे भाग पडले. धरणाच्या गाळमोरीतुन 3400 क्युसेक ने पाणी सोडण्यात आले आहे. तो 7000 पर्यंत वाढवुन 5 ते 5.5 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

 सोलापुर शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नदीत पाणी सोडल्यामुळे नदीत ठिकठिकाणी असणाऱया बंधारेची दारे काढण्यात आले आहेत. उजनी धरणात सध्यस्थितीत उपयुक्त पाणीसाठा केवळ 43 टीएमसी राहिला आहे यात 20 ते 25 टीएमसी गाळव रेतीच असल्याने  उजनीत केवळ 20-21 टीएमसी पाणी राहिले आहे, ते ही मायनस पातळीतील आहे, उजनीतुन भीमा नदीत आता 5.5 टीएमसी सोडले जाणार आहे. पाणी सोडल्याने भीमा नदीकाठ व सोलापुरकरासाठी पिण्याचा  पाणीसाठा होणार आहे.

   उजनी धरणाचा पाणीसाठा कमालीचा घटला असल्याने कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी बंद करावै लागले आहे. उजनीतुन कालव्यात पाच दारातून सोडले जाते परंतु सध्या उजनीचे पाणी त्या पाच दाराच्या बेड पातळीच्या खाली गेल्याने उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडणे अशक्य झाले आहे. या अगोदरच उजनीतून बोगद्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद झाले आहे. भीमानदीत ही केवळ गाळमोरीतुन पाणी सोडावे लागते आहे.