|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » किंग्स चषक स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंची निवड

किंग्स चषक स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंची निवड 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय फुटबॉल संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक इगोर स्टीमाक यांनी किंग्स चषक स्पर्धेच्या तयारीसाठी 37 संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. थायलंडमधील बरिराम येथे 5 ते 8 जून या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

या निवडण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर 20 मे पासून दिल्लीत घेतले जाणार आहे. ‘या वर्षी यूएईमध्ये झालेल्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या संघाचा मला आदर आहे. उर्वरित खेळाडूंची निवड आय लीग व आयएसएलमधील सामन्यांचे निरीक्षण करून करण्यात आली आहे. काही खेळाडू खूपच उपयुक्त असल्याचे वाटल्याने मी त्यांना शिबिरासाठी बोलावले आहे. दिल्लीत येण्यास व लगेचच कामाला सुरुवात करण्यास मी आतुर झालो आहे. मला नव्या आव्हानांना सामोरे जाणे नेहमीच आवडते आणि या ब्ल्यू टायगर्सना मार्गदर्शन करण्यास मी उत्सुक झालो आहे,’ असे स्टीमाक यांनी सांगितले.

स्ट्रायकर जेजे लालपेखलुआवर मे च्या तिसऱया आठवडय़ात शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने त्याचा शिबिरासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे हलिचरण नारझरी (गुडघ्याची दुखापत), मंदार राव देसाई (धोंडशिरेची दुखापत), आशिक कुरुनियान (गुडघ्याची दुखापत), नरेंदर गेहलोत (गुडघा दुखापत) आणि जेरी लालरिनझुआला या जखमी खेळाडूंचाही विचार करण्यात आलेला नाही. किंग्स चषक स्पर्धेनंतर जुलैमध्ये इंटरकॉन्टिनेन्टल चषक स्पर्धा होणार आहे. निवडण्यात आलेले 37 संभाव्य खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.

गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदर सिंग, कमलजित सिंग. बचावफळी : प्रीतम कोटल, निशू कुमार, राहुल भेके, सलाम रंजन सिंग, संदेश झिंगन, आदिल खान, अन्वर अली ज्युनियर, सुभाशिष बोस, नारायण दास. मध्यफळी : उदांता सिंग, जॅकिचंद सिंग, ब्रँडन फर्नांडीस, अनिरुद्ध थापा, रेनीयर फर्नांडीस, बिक्रमजित सिंग, धनपाल गणेश, प्रणय हलदर, रोलिन बोर्जेस, जर्मनप्रीत सिंग, विनित राय, सहल अब्दुल, अमरजित सिंग, रेडीम त्लांग, लालियनझुआला छांगटे, नंद कुमार, कोमल थाटल, मायकेल सूसाईराज. आघाडीफळी : बलवंत सिंग, सुनील छेत्री, जॉबी जस्टिन, सुमीत पासी, फारुख चौधरी, मनविर सिंग.