|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » क्रिडा » जपानची ओसाका तिसऱया फेरीत वृत्तसंस्था

जपानची ओसाका तिसऱया फेरीत वृत्तसंस्था 

रोम :

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानच्या टॉप सीडेड नाओमी ओसाकाने एकेरीची तिसरी फेरी गाठताना सिबुलकोव्हाचा  पराभव केला.

बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया फेरीच्या सामन्यात जपानच्या 21 वर्षीय ओसाकाने स्लोव्हाकियाच्या सिबुलकोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. ओसाकाने हा सामना 100 मिनिटांच्या कालावधीत जिंकला. गेल्या आठवडय़ात माद्रीदमध्ये झालेल्या टेनिस स्पर्धेत ओसाकाने सिबुलकोव्हाचा पराभव केला होता. ओसाकाचा हा सिबुलकोव्हावरील चौथा विजय आहे. रोमच्या या स्पर्धेत ओसाकाने पहिल्यांदाच तिसरी फेरी गाठली आहे. तिने यापूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.