|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कबड्डी स्पर्धेत अळवाजचा संघ विजेता

कबड्डी स्पर्धेत अळवाजचा संघ विजेता 

प्रतिनिधी /निपाणी :

येथील व्हीएसएम संस्थेच्या सोमशेखर कोठीवाले अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन महिलांच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेत अळवाज येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने बेंगळूरच्या व्हीकेआयटी संघाचा 33-9 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोठीवाले यांनी, खेळाडूंनी जय-पराजय न पाहता शारीरिक व मानसिक सक्षमिकरणासाठी खेळ खेळण्याचे आवाहन केले. सदर स्पर्धेत अळवाज संघाने चिक्कबळापूर येथील एसजेसीआयटी संघाचा 24-8 अशा फरकाने तर व्हीकेआयटी संघाने मुडबिदरी येथील वायआयटी संघाचा 25-11 अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

स्पर्धेनंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्हीटीयुचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजेश वाय. एच., प्राचार्य डॉ. प्रकाश हुबळ्ळी, शारीरिक शिक्षण संचालक शशिराज तेली, संगीता कराळे, कुमारस्वामी के., जयराम पी. आर., उमेशगौडा, जी. एस. यळ्ळूर, प्रा. राकेश कुमार, प्रा. आशालता यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, खेळाडू उपस्थित होते.

Related posts: